मुंबई : मुंबई शहराला संप हा शब्द काही नवीन नाही, कारण संप शब्दाशिवाय मुंबईचा इतिहास पूर्णच होवू शकत नाही. मुंबईत अगदी मिल कामगार, बेस्ट कामगारांपासून, टाईम्स युनियनचे कामगार यांचे संप गाजले आहेत.
मुंबापुरीला एका क्षणात बंद करण्याची ताकद काही वर्षांपूर्वी कामगारांमध्ये होती. या संपाची काही क्षणचित्रे एका व्हिडीओत कैद झाली आहेत. या व्हिडीओत अनेक प्रकारचे संप चित्रित करण्याक आले आहेत.
यात अगदी बेस्ट-ट्रामचाही संप दिसून येतो, मिल कामगारांचाही संप यात चित्रित झाला आहे, एवढंच नाही सीएसटीएमसमोरील टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकाच्या कार्यालयासमोरील टाईम्स युनियन कार्यकर्त्यांचा देखील संप यात चित्रित झाला आहे.
ही संपाची क्षणचित्रं आज पाहण्यात वेगळीच गंमत वाटते, ७० वर्षांपूर्वी मुंबईतील ठिकाणं कशी होती, मुंबईतल्या पोलिसांचा पोषाख आणि मुंबईतील वाहतूक व्यवस्था कशी होती याची कल्पना येते. ब्रिटीश पाथचा हा व्हिडीओ आहे.