व्हिडिओ: 'अमृतां'च्या तालावर थिरकले 'देवेंद्र'

नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चच्या माध्यमातून नदिचे गाणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. हे गाणे ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) प्रकारातले असून, यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत हलकासा ठेका धरल्याचे पहायला मिळते. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 26, 2018, 11:05 AM IST
व्हिडिओ: 'अमृतां'च्या तालावर थिरकले 'देवेंद्र' title=

मुंबई : सरकारी उपक्रमाची माहिती देण्यासाठी विद्यमान राज्य सरकार नवनव्याच क्लृप्त्या लढवताना दिसत आहे. नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चच्या माध्यमातून नदिचे गाणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. हे गाणे ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) प्रकारातले असून, यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत हलकासा ठेका धरल्याचे पहायला मिळते. सोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारही या ध्वनिचित्रफीतीत झळकताना दिसत आहेत.

सोनू निगम आणि अमृता फडणवीस याचा आवाज

प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि अमृता फडणवीस यांच्या आवाजात हे गीत ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. या गाण्याच्या निमित्ताने येत्या४ मार्चला नद्यांची प्रत्यक्ष परिस्थिती पाहायला नदी परिक्रमेसाठी दहिसर नदी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आले आहे.

ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल

या ध्वनिचित्रफीतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबईचे डबेवाले, कोळी बांधव, तसेच निसर्ग पहायाल मिळतात. सध्या ही ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच, या ध्वनिचित्रफीतीवर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.