मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती, पदवीधरांना दीड लाखांवर पगार; 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai Port Trust Job 2023: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत एकूण 14 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 28, 2023, 04:42 PM IST
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती, पदवीधरांना दीड लाखांवर पगार; 'येथे' पाठवा अर्ज title=

Mumbai Port Trust Bharti 2023: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यत आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत एकूण 14 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. सिक्युरिटी ऑफिसर, वेल्फेअर ऑफिसर, सिनिअर वेल्फेअर ऑफिसर, डेप्युटी अॅडमिनिस्ट्रेटर (वेल्फेअर), हिंदी ऑफिसर, हिंदी ट्रान्सलेटर ग्रेड-2 या जागा भरण्यात येणार आहेत. 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. 

सेंट बँक होम फायनान्समध्ये बंपर भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

सुरक्षा कार्यालय आणि कल्याण अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाारांचे वय 21 ते 30 वर्षांदरम्यान असावे. वरिष्ठ कल्याण अधिकारी आणि हिंदी अधिकारी पदासाठी उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षांदरम्यान असावे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50 हजार ते 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. उपव्यवस्थापक ((वेल्फेअर) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 40 वर्षांदरम्यान असावे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60 हजार ते 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. हिंदी अनुवादक ग्रेड-II पदासाठी उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांदरम्यान असावे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 29 हजार ते 891 लाख 100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

उल्हासनगर महानगरपालिकेत बंपर भरती, 'ही' संधी अजिबात सोडू नका

निवड झालेल्या उमेदवारांना 6 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा