आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आझाद मैदानातून हटकले

MSRTC staff protest :आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून बाहेर काढले आहे. 

Updated: Apr 9, 2022, 08:19 AM IST
आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आझाद मैदानातून हटकले title=
प्रातिनीधिक फोटो

मुंबई : MSRTC staff protest :आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून बाहेर काढले आहे. (ST protesters at Azad Maidan) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवून आता सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर बसवण्यात आले आहे. (Mumbai cops ask protesting MSRTC staffers to vacate Azad Maidan area)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी आझाद मैदान खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी बाहेर निघण्यास नकार दिला होता. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका कर्मचा-यांनी घेतली होती. मात्र मध्यरात्री पोलिसांनी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली.

एसटी आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावून सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर नेण्यात आले. काही आंदोलकांना त्यांचे अश्रू अनावर झाले होते. यावेळी 5 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती आंदोलनकांनी दिली. या सर्व आझाद मैदान खाली करण्यासाठी सांगितले आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धरणं आंदोलन 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मुंबईत धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. पवारांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने चप्पल आणि दगडफेक करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीचे खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मंत्रालयासमोरच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करणार आहेत. आजच्या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी होणार आहेत.