मोठी बातमी : 'त्या' एका Call नंतर मुकेश अंबानीच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ!

 अँटीलियासमोर 2 संशयीत व्यक्ती दिसून आल्याने सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Updated: Nov 8, 2021, 07:19 PM IST
मोठी बातमी : 'त्या' एका Call नंतर मुकेश अंबानीच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ! title=

मुंबई : मुकेश अंबानीच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  अँटीलियासमोर 2 संशयीत व्यक्ती दिसून आल्याने सुरक्षा वाढवण्यात आली आहे. टॅक्सी ड्रायव्हरच्या फोनवरुन ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संशयित व्यक्ती अँटीलियासमोर असल्याची माहिती या टॅक्सी ड्रायव्हरने दिली. 

आता मुंबई पोलिस या टॅक्सी चालकाचा जबाब नोंदवून घेत आहेत. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये याबाबत जबाब नोंदवण्यात येत आहे.

हे कोण लोक होते याबाबत पोलिस चौकशी करत आहे. पोलिसांची टीम सुद्धा मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर तैनात करण्यात आली आहे. 2 व्यक्ती असल्याची माहिती ड्रायव्हरने पोलिसांना दिली आहे. मुंबई पोलिसांना फोन करुन टॅक्सी ड्राव्हरने ही माहिती दिली आहे. 

या व्यक्तींच्या हातात मोठ्या बॅग देखील असल्याचं समजतंय. आणि ते  अँटीलियाचा पत्ता विचार होते. हे सर्व ऐकताच ड्रायव्हरने पोलिसांना फोन करुन माहिती दिली. हे दोन संशयित उर्दू भाषेत संवाद साधत होते. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.