Coronavirus : उपचारासाठी वणवण फिरणाऱ्या 'त्या' पोलिसाने सोडले प्राण

पोलिस दलाला तिसरा धक्का 

Updated: Apr 27, 2020, 06:44 PM IST
Coronavirus : उपचारासाठी वणवण फिरणाऱ्या 'त्या' पोलिसाने सोडले प्राण  title=

मुंबई : मुंबई पोलिसांना आणखी एक धक्का बसला आहे. पोलीस दलातील आणखी एका शिपायाची मृत्यूशी झुंज अखेर संपली. कुर्ला वाहतूक विभागतील ५६ वर्षीय पोलीस शियापाचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे.काही दिवसांपूर्वी अचानक तब्बेत बिघडल्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांना खासगी क्लिनिकमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर जवळपास चार ते पाच सरकारी रूग्णालयात फिरवण्यात अखेर त्यांची आज मृत्यूशी झुंज संपली आहे. (कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख, वारसाला सरकारी नोकरी) 

 

अचानक ताप येऊन लागल्यामुळे त्यांना खासगी आणि नंतर राजावाडी ते कस्तुरबा.. कस्तुरबा ते नायर... नायर ते केईएम असं नेण्यात आलं. यावेळी केईएममध्ये त्यांना पोलिसांच्या मध्यस्तीने दाखल करण्यात आलं सकाळी ९ वाजता घराबाहेर पडलेले हे पोलिस शिपाई रात्री १० वाजता रूग्णालयात दाखल झाले. (कोरोनामुळे मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

 कोरोना व्हायरसमुळे शनिवारी मुंबई पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर (वय ५७) यांचा मृत्यू झाला. ते वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली.मुंबईत करोनामुळे पोलिसाचा झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. चंद्रकांत पेंदूरकर यांना २२ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.