Video : 'मातोश्री'वर आढळला विषारी साप, रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी उद्धव ठाकरे घराबाहेर

Snake at Matoshree : मातोश्रीवर विषारी साप आढळल्याने एकच खळबळ माजली. 

Updated: Aug 7, 2023, 10:32 AM IST
Video : 'मातोश्री'वर आढळला विषारी साप, रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी उद्धव ठाकरे घराबाहेर  title=
Mumbai news poisonous snake found at uddhav thackerays residence matoshree watch video

Snake at Matoshree : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील (Snake video) मातोश्रीवर विषारी साप आढळून आला. वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेक्शन अँड रेस्क्यू असोसिएशन संस्थेला या सापाची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्पमित्रांकडून या चार फुटाच्या सापाला रेस्क्यू करण्यात आलं. सापाला पकडताना खुद्द उद्धव ठाकरे इथे उपस्थित होते.

या सापाला पडकल्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. (Mumbai news poisonous snake found at uddhav thackerays residence matoshree watch video)

दरम्यान गेल्या महिन्यात खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या मुंबईतील घरात साप निघाला होता. भांडूपमधील निवासस्थानी संजय राऊत पत्रकार परिषद घेत असताना हा साप निघाल्यामुळे एकच खळबळ माजली. 

ही लिंक बघा - VIDEO : संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत सापाचा फुत्कार; ते बोलत असतानाच तो आला अन्...