Central Railway Diwali Special Train: सणा-सुदींच्या दिवसात ट्रेन, एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत जाते. अनेक जण दिवाळीत गावी जाण्यासाठी धडपडत असतो पण कधी कधी तिकिट मिळवण्यास अडचणी येतात. वाढत्या गर्दीमुळं मध्य रेल्वेने फेस्टिव्ह सिझनमध्ये स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून नागपूर- मुंबई, सीएसएमटी-दानापुर आणि दुर्गापुरा (जयपूर)- दौंडमार्गे 9 अतिरिक्त ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी आणि छट पुजेच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई आणि पुण्यातून राज्यातील विविध भागात आणि राज्याबाहेरही अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. 4 ऑक्टोबर 2023पासून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन बुकिंग सुरू झाले आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने आत्ताच तिकिट बुकिंग करु शकता. छट पूजेच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, बिहार राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते, हाच विचार डोक्यात घेऊन मध्य रेल्वेने राज्याबाहेर जाणाऱ्या लोकलची संख्या वाढवली आहे.
ट्रेन क्रमांक 01103 नागपुर-मुंबई वन वे स्पेशल नागपुरहून 16.11.2023 रोजी 22.00 वाजता निघेल आणि 13.40 मिनिटांनी सीएसएमटी येथे पोहोचेल.
कुठे थांबेल- वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर.
ट्रेन क्रमांक 01107 मुंबई-दानापूर सुपरफास्ट स्पेशल सीएसएमटी मुंबईहून दर शनिवारी 11.05 वाजता म्हणजे 18.11.2023 आणि 25.11.2023 (2 सेवा) सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 14.00 वाजता दानापूरला पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01108 दानापूर-मुंबई सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक रविवारी म्हणजे 19.11.2023 आणि 26.11.2023 (2 सेवा) रोजी दानापूर येथून 16.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 23.15 वाजता CSMT मुंबईला पोहोचेल.
कुठे थांबेलः दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं. बक्सर आणि आरा
गाडी क्रमांक ०९७३९ दुर्गापुरा-दौंड सुपरफास्ट स्पेशल दुर्गापुराहून १५.११.२०२३ आणि २२.११.२०२३ (२ सेवा) रोजी १८.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.२० वाजता दौंडला पोहोचेल. गाडी क्रमांक ०९७४० दौंड-दुर्गापुरा सुपरफास्ट स्पेशल दौंड येथून १६.११.२०२३ आणि २३.११.२०२३ (२ सेवा) रोजी २३.१० वाजता सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी 22.05 वाजता दुर्गापुराला पोहोचेल.
कुठे थांबेलः सवाई माधोपुर, कोटा, नागदा, रतलाम, गोधरा, वडोदरा, सूरत, वलसाड, वापी, वसई रोड पनवेल, लोणावळा और पुणे
ट्रेन नंबर 01103/01107 आणि 09740 ट्रेनसाठी बुकिंग करण्यासाठी 13.11.2023 रोजी सर्व आरक्षण केंद्र आणि वेबसाइटवर सुरू होईल. www.irctc.co.in वर तुम्ही बुकिंग करु शकता.