आमची मुलगी गेली, त्याला तरी का जगू द्यावं..? रुपालीच्या कुटुंबियांचा आक्रोश

हिंदू बायकोने बुरखा घातला नाही म्हणून मुस्लीम पतीने चिरला गळा

Updated: Sep 27, 2022, 02:26 PM IST
आमची मुलगी गेली, त्याला तरी का जगू द्यावं..? रुपालीच्या कुटुंबियांचा आक्रोश title=

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील टिळकनगरमध्ये (Mumbai Tilaknagar) हिंदू पत्नीने बुरखा (Burkha) परिधान केला नाही म्हणून मुस्लीम पतीनं चाकूनं गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इक्बाल शेख  (iqbal shekh) असं आरोपीचं नाव आहे. इक्बालचा रुपाली चंदनशिवे हिच्याशी (rupali chandanshive) 3 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. पण, या दोघांमध्ये मुस्लीम रितीरिवाज पाळण्यावरून (muslim rituals) नेहमीच खटके उडत होते

पत्नी रुपाली ही हिंदू असल्याने ती बुरखा घालण्यास नकार देत होती. याच वादातून दोघांमध्ये नेहमी भांडणं व्हायची. यामुळे रुपाली इक्बालकडे तलाख मागत होती. रुपालीला मुलाचाही ताबा हवा होता. त्यामुळे चिडलेल्या इक्बालने रुपालीची गळा चिरून हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. पण, या हत्येमुळे लव्ह जिहादचा बळी गेल्याचं समोर आलंय.

रुपालीच्या कुटुंबियांची व्यथा
आमची मुलगली जीवानिशी गेली, आमच्या मुलीची हत्या केली, आता आमची इच्छा आहे कि तोही जगला नाही पाहिजे, असा आक्रोश रुपालीच्या कुटुंबियांनी केला आहे. नवऱ्याच्या इच्छेखातीर रुपाली डोक्यावरुन ओढणी घ्यायची पण तिला बुरखा घालण्याची जबरदस्ती केली जात होती. पण तिला ते येत नव्हतं, फक्त लग्न केलं म्हणून तुम्ही हवं ते तीने करायला हवं होतं का असा सवाल रुपालीच्या बहिणीने उपस्थित केला आहे. 

महाराष्ट्रात पसरतंय लव्ह जिहादचं जाळं?
देशभरात वारंवार लव्ह जिहादच्या घटना समोर येत असल्याने महाराष्ट्रातही याचा प्रसार होतोय का अशी चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांवरुन लव्ह जिहादबाबतही महाराष्ट्रात चर्चा सुरु झालीय. काही दिवसांपूर्वी अमरावतीचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी लव्ह जिहाद असल्याचा दावा केला होता. धारणी येथे राहणाऱ्या एका हिंदू तरुणीला मुस्लिम तरुणाने पळवून नेले आणि अमरावतीत आणले. जिथे तिचा चंद्रविला ट्रस्टमध्ये विवाह झाला. या प्रमाणपत्रावर काजीने सही केल्याची माहिती समोर आली. यानंतर लव्ह जिहाद अंतर्गत मुस्लिम तरुण तरुणींना टार्गेट करत असल्याचा आरोप खासदार बोंडे यांनी केला होता.