आनंदाची बातमी : मुंबई लोकल 'या' दिवसापासून सुरु होण्याचे संकेत

 एक जानेवारीपासून रेल्वे रुळावर आणू असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. 

Updated: Dec 15, 2020, 10:44 AM IST
आनंदाची बातमी : मुंबई लोकल 'या' दिवसापासून सुरु होण्याचे संकेत title=

मुंबई : सर्वसामान्य मुंबईकर ज्या निर्णयाची वाट पाहत आहेत त्याबद्दल आज सरकारतर्फे माहिती देण्यात आली. महिलांसाठी लोकल सुरु असली तरी सर्वांसाठी लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न साऱ्यांना पडलाय. यावर आता नव्या वर्षात एक जानेवारीपासून रेल्वे रुळावर आणू असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. 

गणपतीनंतर राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट देखील झाली. मात्र दिवाळीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. त्यामुळे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. 

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येतेय. दुसरी लाट येणार असं म्हटलं जात होतं पण तशी चिन्ह दिसत नाहीयत. त्यामुळे नव्या वर्षात लोकल सुरु व्हायला अडचण नसावी अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली. 

३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी माहिती दिली होती. कोरोनाचं सावट अद्यापही असल्याने लोकल सेवा सुरू करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी काही दिवस पर्यायी वाहतूकीने प्रवास करण्याचा सल्ला प्रवाशांना दिला.