मुंबईत एसी लोकलसह First Class नं प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाई कधी?

Mumbai Local : मुंबईत दर दिवशी मोजणंही अशक्य होईल इतकी मंडळी रेल्वेनं प्रवास करतात. पण, या साधनाचा फायदा घेत असताना किमान दरात उपलब्ध असणारी तिकीच काढणंही बऱ्याचदा टाळलं जातं.   

Updated: Apr 20, 2023, 10:24 AM IST
मुंबईत एसी लोकलसह First Class नं प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाई कधी?  title=
mumbai local news late night ac trains fist class free passangers number increased trains do not have tc

Mumbai Local : मुंबई लोकलनं दर दिवशी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये- जा सुरु असते. शहराला थेट कर्जत कसारा आणि थेट डहाणूपर्यंत जोणाऱ्या या मार्गानं प्रवास करत असताना रेल्वे विभागाकडून शक्य त्या सर्व सुविधा प्रवाशांना पुरवण्यात येतात. मात्र असं असूनही काही घटकांमुळे प्रवाशांना बऱ्याच त्रासाचा सामना करावा लागत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे (Mumbai Central And Western Railway). 

दर दिवशी विविध वेळांमध्ये विविध स्थानकांवरून मोठ्या संख्येनं नागरिक मुंबई लोकलनं प्रवास करताना दिसतात. गेल्या काही वर्षांमध्ये गर्दीच्या ठराविक वेळा वगळता इतरही वेळांमध्ये लोकलमध्ये प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. जास्तीच्यी लोकल, राखीव लोकल, राखीव डबे इतकी विभागणी करूनही प्रवाशांची गर्दी विभागणं रेल्वेसाठी कठीण झालं असून, आता आणखी एक आवाहन दर दिवसागणिक रेल्वे विभागाची डोकेदुखी वाढवताना दिसत आहे. 

फुकटे प्रवासी... 

हे आवाहन म्हणजे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं. सध्याच्या घडीला रात्री आठ वाजल्यानंतर रेल्वेमध्ये TC नसल्यामुळं यादरम्यान तिकीट न काढताच प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढताना दिसत आहे. तिकीट किंवा पास नसताना रेल्वेचा द्वितीय श्रेणी आणि प्रथम श्रेणीतही काही मंडळी सर्रास शिरतात आणि प्रवास करताना दिसतात. 

एसी लोकलमध्येही हल्ली असा फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याची बाब प्रवाशांच्या निदर्शनास येऊ लागल्यामुळं या मंडळींवर कारवाई कोण आणि कधी करणार हाच प्रश्न सातत्यानं उपस्थित होताना दिसत आहे. अनेकदा हे प्रवासी प्रथम श्रेणी डब्यात शिरून आसनांवर बसतात, तिकीटाबद्दल विचारलं असता तिथं असणाऱ्या सहप्रवाशांसोबत वाद घालतात. बऱ्याचदा हा वाद विकोपासही जातो. पण, आजुबाजूला संबंधित यंत्रणेची कुणीही व्यक्ती नसल्यामुळं या फुकट्या प्रवाशांना सध्या कोणतंही शासन घडवलं जात नाहीये. 

हेसुद्धा पाहा : Mumbai News : यंदाच्या पावसाळ्यादरम्यान मुंबईत 'हे' 25 दिवस धोक्याचे; समुद्रही खवळणार 

 

एकिकडे महिन्याला प्रवास सुकर व्हावा याच हेतूनं पास किंवा अगदी एसी लोकलचं जास्त किंमत असणारं तिकीट काढून प्रवास करणारे प्रवासी प्रामाणिकपणे नियमांचं पालन करत असताना फुकट प्रवास करणारी मंडळी मात्र त्यांना या प्रवासातही मनस्ताप देताना दिसत आहेत. बऱ्याचदा आसनासोबतच उभं राहण्यावरूनही रेल्वे डब्यात कडाक्याची भांडणंही होताना दिसत असल्यामुळं आता रेल्वे स्थाकांमध्ये प्रवेश करतानाच तिकीट किंवा तत्सम प्रकारची यंत्रणा लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.