मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल बंद

Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर शनिवारी मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. कसं असेल रेल्वेचं टाइमटेबल जाणून घ्या 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 19, 2024, 07:50 AM IST
मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल बंद title=
Mumbai local alert Central Railways to operate mega block on 20 july saturday

Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर शनिवारी विशेष मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळं शनिवारी लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. तर, काही एक्सप्रेसलाही त्याचा फटका बसणार आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरही ब्लॉकचा परिणाम होणार आहे. त्यामुळं शनिवारी कसं असेल लोकलचे वेळापत्रक जाणून घेऊया. 

कर्नाक बंदर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या पुलाच्या तुळया उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठीच मध्य रेल्वेकडून विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री 12.30 पासून पहाटे 4.30 वाजेपर्यंत असा चार तासांचा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळं सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड अशा लोकल सेवा बंद असणार आहेत. तसंच, मेगाब्लॉकमुळं इतर लोकल व एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे.

असं असेल वेळापत्रक 

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळे ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर, मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील लोकल भायखळा, परळ, ठाणे आणि कल्याणपर्यंत चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. तसेच या स्थानकातून पनवेल दिशेकडे लोकल धावतील.

असं असेल  मेगाब्लॉकचे वेळापत्रक 

मुख्य मार्ग

- मेगाब्लॉकपूर्वी  रात्री १२.१४ वाजता सीएसएमटी ते कसारा शेवटची लोकल असेल.

- ब्लॉकपूर्वी रात्री १०.३४ वाजता कल्याण ते सीएसएमटी शेवटची लोकल असेल.

- ब्लॉकनंतर पहाटे ४.४७ वाजता सीएसएमटी ते कर्जत पहिली लोकल असेल.

- ब्लॉकनंतर पहाटे ४ वाजता ठाणे ते सीएसएमटी पहिली लोकल असेल.

हार्बर मार्ग

– ब्लॉकपूर्वी रात्री १२.१३ वाजता सीएसएमटी ते पनवेल शेवटची लोकल असेल.

– ब्लॉकपूर्वी रात्री १०.४६ वाजता पनवेल ते सीएसएमटी शेवटची लोकल असेल.

– ब्लॉकनंतर पहाटे ४.५२ वाजता सीएसएमटी ते पनवेल पहिली लोकल असेल.

– ब्लाकनंतर पहाटे ४.१७ वाजता वांद्रे ते सीएसएमटी पहिली लोकल असेल.

या एक्स्प्रेसना फटका 

मेगाब्लॉकमुळं या एक्सप्रेसना फटका बसणार आहे. या काही एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावणार आहेत. 

हावडा ते सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस, अमृतसर ते सीएसएमटी एक्स्प्रेस, मडगाव ते सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, भुवनेश्वर ते सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, हावडा – सीएसएमटी मेल