Lalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''

Lalbaug Crime : लालबाग हत्याकांडने अख्खा मुंबईला हादरुन सोडलं आहे. तब्बल 3 महिने आईच्या मृतदेहासोबत एक मुलगी घरात बंद होती. या हत्याकांडमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली त्यात हादरुन सोडणारं सत्य समोर आलं आहे. 

Updated: Mar 21, 2023, 10:33 AM IST
 Lalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''  title=
mumbai lalbaug murder police Sandwich hotel staff shocking revelation of veena jain murder case rimple jain crime news in marathi

Mumbai Lalbaug Murder : मुंबईतील लालबागमधील एका चाळीत एका मुलीने आईच्या मृत्यूनंतर तिच्या शरीराचे तुकडे केले. या मृतदेहांच्या तुकड्यांसह तब्बल तीन महिने ती घरात राहत होती. नातेवाईकांनी आपली बहिण बेपत्ता आहे अशी तक्रार केल्यावर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. 

या घटनेनंतर मुंबईत एकच खळबळ माजली. पोटच्या पोरीने आईचे असे तुकडे केल्याचं ऐकून अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. निदर्यपणे आणि क्रूररित्या तिने आपल्या आईच्या शरीराचे तुकडे केले आणि त्यांना घरात वेगवेगळ्या जागी लपवलं.पोलिसांनी मुलगी रिंपल जैनला अटक केली आहे. 

पोलिसांनी आतापर्यंत या घटनेत 6 जणांची चौकशी केली. त्या चौकशी दरम्यान धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या हाती या हत्याकांडचे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या 6 जणांपैकी तिचा प्रियकर आणि सँडविच हे महत्त्वाचे होते. लालबागच्या पेरुबाग कंपाउंड परिसरातील साई फास्ट फूड सेंटर आणि एका चायनीज हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे.

''काकूंचा श्वास...'' 

एका चायनीज हॉटेलमधील एक कर्मचारी रिंपलच्या शेजारी राहत होता. तो चौकशी दरम्यान म्हणाला की, ''26 डिसेंबरला आम्ही शांत झोपलो होता. पहाटे आमचा एक सहकारी बाहेर पडला तेव्हा तिल्या जैन काकू खाली पडल्याचं दिसलं. त्याने आम्हाला उठलं आणि आम्ही रिंपलच्या मदतीला गेलो. काकूच्या हातावर जखम झाली होती. ''

''आम्ही त्यांना घरी नेण्यासाठी मदत केली. त्यावेळी रिंपल हिला आम्ही सांगितलं होतं की, काकूंचा श्वास चालत नाहीय. आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. हे ऐकून ती आमच्यावर वैतागली आणि आम्हाला उलटसूलट बोलून घरातून हाकलून लावलं. ''

सँडविचवाला काय म्हणाला...

श्री साई फास्ट फूड सेंटरचा उमेश खवरे यांनी पोलिसांना सांगितले की, आरोपी रिंपल जैन आपल्याकडून क्रेडिटवर जेवणाची मागणी करायची. तिच्या एका चॅटमध्ये जैनने त्याला तीन वडा पाव डिलिव्हर करायला आणि तिचा फोन रिचार्ज करायला सांगितलं होतं. 27 डिसेंबर 2022 ला तो रिंपलच्या घरी गेला असता त्याला आई बेडवर पडलेली दिसली. त्याने रिंपलला तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं ज्याला रिंपलने सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, सँडविच विक्रेत्याने रिंपलला बॉडी हॅक करण्यात मदत केल्याचा इन्कार केला. 

संगमरवरी कटर खरेदी

पोलीस सुत्रांनुसार 27 डिसेंबर रोजी दुपारी रिंपलने आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संगमरवरी कटर विकत घेतला होता. ''कटर विकत घेण्याचा निर्णय आश्चर्यकारकपणे त्वरित होता. घरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या हार्डवेअर दुकानाच्या विक्रेत्याचा या हत्याकांडाबद्दल जबाब नोंदवण्यात आला आहे.

भयावह दृश्यं

तिने आधी तिच्या आईचे हात शरीरापासून वेगळे केले, त्यानंतर खालचे पाय आणि नंतर मांड्या कापल्या. त्यानंतर, तिने तिचे डोके तोडले आणि धड एका बारीक गोणीत भरलं. ज्या कपाटातून ते जप्त करण्यात आले होते. 

रिंपलने मात्र तिचे सर्व पैसे कटिंग मशिनवर खर्च केले आणि चाळीच्या तळमजल्यावरील श्री साई फास्ट फूड सेंटरमधून क्रेडिटवर अन्न मिळवण्यास सुरुवात केली. भोजनालयाचा व्यवस्थापक उमेश खवरे हा आता या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आहे आणि त्याने रिंपलसोबत दिलेले मजकूर संदेश पोलिसांनी जप्त केले आहेत. 

रिंपल चौकशीदरम्यान काय म्हणाली?

रिंपलने आईची हत्या केलाचा आरोप फेटाळून लावला आहे. ''आईच्या मृत्यूनंतर नातेवाईक आणि चाळीतील लोक तिच्यावर आईच्या मृत्यूसाठी जबाबदार धरतील, अशी तिला भीती होती. त्यामुळे तिने आई खाली पडून मेली ही गोष्ट लपवून ठेवली. ती पोलिसांनी म्हणाली की, आईच्या मृत्यूनंतर नातेवाईक आमची मालमत्ता आणि बँक बॅलन्स हडप करतील, म्हणून मी कोणालाही सांगितलं नाही.''

दरम्यान काळाचौकी पोलिसांनी 14 मार्चला रिंपल जैनला अटक केली आहे. त्यानंतर या चौकशीला वेग आला. रिंपलला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.