झी २४ तास विशेष : पाणीपुरी किती स्वच्छ असते ?

Bollywood Life | Updated: Jul 28, 2018, 09:53 PM IST

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : गुजरात मधील बडोद्या शहरात पाणीपुरी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे . अस्वच्छ पध्दतीने बनवले जाणारे हे पदार्थ रोगराईचा फैलाव करतात . जिभेला चविष्ट लागणारे हे पदार्थ पोटाला मात्र त्रासदायक आहेत हीच बाब लक्षात घेत बडोद्यातील महापालिकेने शहरात पाणीपुरीच्या विक्रीला बंद केले आहे.