मुंबई : मुंबई - गोवा महामार्ग हा देशातील सगळ्यात जास्त वाहतूक असलेला महामार्ग असून तो तितकाच दुर्लक्षित असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी हे निरीक्षण नोंदवले आहे.
मुंबई गोवा महामार्गाच चौपद्रीकरण सध्या सूरू असून पनवेल ते इंदापूरपर्यंतच्या महामार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तर उर्वरीत ५०३ किलोमीटरच्या महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. यावेळी आतापर्यंतच्या कामाचा लेखाजोखा दोन्ही प्राधिकरणांनी कोर्टात सादर केला.
आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामाचा दर्जाची पडताळणी खासगी संस्थांकडून केली जात असून पुढील सुनावणीला त्याचा अहवाल न्यायालयात राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर करायचा आहे. पाच ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली आहे.