मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम येत्या जून २०१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती सावर्जनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची दिलीय.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन अधिग्रहणाची जवळपास ९० टक्के कामं पूर्ण झालीयत. त्यामुळं चौपदरीकरण मुदतीत पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला.
महामार्गाच्या चौपदरीकरणांच्या कामांचा आढावा त्यांनी आज घेतला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे प्रमुख जिल्हा मार्ग आणि जिल्हा मार्ग हे खड्डेमुक्त झाल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.