मुंबई : मुंबईसह उपनगरामध्ये आग लागण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी आग लागल्याची घटना ताजी असताना आणखी एका ठिकाणी आगीचा भडका उडाला आहे.
विलेपार्ले पश्चिम येथील LIC इमारती मध्ये आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Fire confined to electric wiring, installation, computers, file records, wooden furniture, etc. in Salary Saving Scheme section on 2nd floor of ground plus upper two-floored LIC Office building. Three small hose lines of 8 motor pumps are in operation: Mumbai fire offical
— ANI (@ANI) May 7, 2022
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
याआधी नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी आग लागल्याची घटना समोर आली. रासायनिक कंपनीला लागलेली आग नियंत्रणात मिळवण्याचं काम सुरू आहे. आग पूर्णपणे विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.
Maharashtra | A massive fire broke out at the Pawane MIDC area in Navi Mumbai. Many fire tenders present on the spot. pic.twitter.com/3ykDiqugOj
— ANI (@ANI) May 6, 2022