कांजूरच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये श्वानांना खायला घालण्यावरुन राडा; दोन गटांत हाणामारी

श्वानांना खायला (dog feeding) घालण्यावरुन अनेकदा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत असतात. मात्र आता मुंबईत (Mumbai Crime) श्वानांना खायला घालण्यावरुन इमारतीमधील दोन गट एकमेकांच्या समोर आले आहेत. कांजूर मार्गच्या रुणवाल फॉरेस्ट या उच्चभ्रू रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स मध्ये श्वानांना खायला करण्यावरून रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.

अमोल पेडणेकर | Updated: Oct 16, 2023, 01:18 PM IST
कांजूरच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये श्वानांना खायला घालण्यावरुन राडा; दोन गटांत हाणामारी title=

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : श्वानांना खायला (dog feeding) घालण्यावरुन अनेकदा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत असतात. मात्र आता मुंबईत (Mumbai Crime) श्वानांना खायला घालण्यावरुन इमारतीमधील दोन गट एकमेकांच्या समोर आले आहेत. कांजूर मार्गच्या रुणवाल फॉरेस्ट या उच्चभ्रू रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स मध्ये श्वानांना खायला करण्यावरून रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.

कांजूरच्या रुणवाल फॉरेस्ट या उच्चभ्रू रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या राड्यात तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे. याच सोसायटीमध्ये काही कुटुंबे ही भटक्या कुत्र्यांना कॉम्प्लेक्समध्ये खायला घालत असतात. परंतु या कुत्र्यांनी आतापर्यंत अनेक जणांचा जावा घेतला आहे. त्यामुळे सोसायटीच्या आवारात श्वानांना खायला घालण्यासाठी इतर सोसायटीमधील सदस्यांनी विरोध केला होता.

या संदर्भात श्वानप्रेमींनी पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी देखील केल्या होत्या. परंतु हा वाद हाणामारी पर्यंत पोहोचला. गेल्या आठवड्यात या कॉम्प्लेक्समधील एक कुटुंब हे श्वानाना खायला घालत असताना सोसायटीतील इतर सदस्य हे लाठ्या-काठ्या घेऊन त्या ठिकाणी पोहोचले आणि दोन्ही बाजूनी शाब्दिक चकमक उडाली. शाब्दिक चकमकीचे पर्यावरण हाणामारीत झालं आणि या श्वानप्रेमींना इतरांनी लाटाकाठ्याने पळून पळून मारलं. 

या संदर्भात सोसायटीच्या रहिवाशांनी या श्वानप्रेमींना आक्षेप घेत भटक्या कुत्र्यांचं प्रेमाण आमच्या सोसायटीत वाढलं असून अनेकांना श्वानदंश झाले असल्याचं सांगितलं आहे. तसेच बाहेरील व्यक्ती ही सोसायटीमध्ये घेऊन कुत्र्यांना खायला घालत असल्याचा आरोप देखील केला आहे. एका उच्चभ्रू रहिवासी इमारतीमध्ये भटक्या कुत्र्यांवरून झालेला हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान पार्कसाईट पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रश्नावरून सध्या रुणवाल कॉम्प्लेक्स मध्ये तणावाचं वातावरण पसरलेला आहे. 

पोलिसांनी माझ्या पतीला लॉकअपमध्ये टाकलं, श्वानप्रेमी महिलेचा आरोप

"आम्ही 10 ते 12 लोक श्वानांना रात्री खायला घालतो. काही लोक त्याला विरोध करतात. मी जेव्हापासून श्वानांना खायला घालायला लागले तेव्हापासून हे लोक गटाने लोकांना मारायला लागले आहेत. कोणत्याही कारणाशिवाय ते लोक महिलांना मारत आहेत. हे कोणत्याही कायद्यात येत नाही. मी पतीसोबत श्वानांना खायला घालायला गेलेली असताना 40 लोकांनी आम्हाला मारहाण केली. हा परिसर रुणवाल यांच्या अंतर्गत येतो. रुणवालच्या सुरक्षा रक्षकाने आम्हाला पकडलं आणि मारहाण करणाऱ्यांच्या स्वाधीन केलं. आम्हाला घरी जाऊ दिलं नाही. ज्यांनी आम्हाला मारलं ते इमारतीच्या कमिटीमध्ये आहेत. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी माझ्या पतीला लॉकअपमध्ये टाकलं," असा आरोप दिया शहा या श्वानप्रेमी महिलेनं केला आहे.

श्वानांना खायला घालायल्या आलेल्या व्यक्तीकडून मारहाण

"मी कुत्र्यांसदर्भात तक्रार केली आहे. इमारतीमधील श्वानप्रेमी हे चुकीच्या जागेवर त्यांना खायला घालतात. जिथे मुले खेळतात आणि वृद्ध नागरिक असतात तिथेच श्वानप्रेमींनी कुत्र्यांना खायला टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे श्वानांनी अनेकांना चावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुलांना तिथे खेळता येत नाहीये. त्या दिवशी जो माणूस आला होता तो चुकीच्या जागेवर श्वानांना खायला घालत होता. तू कुठे राहतो अशी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उत्तर दिलं नाही. तो माणूस आम्हाला बाहेरुन आलेला वाटत होता. त्यानंतर त्या व्यक्तीने आमच्यावर हल्ला केला. माझ्यावर स्प्रे मारून माझ्या नाकावर मारलं. त्यामुळे मी खाली पडलो," असे स्थानिक नागरिक दिलीप डिचोलकर यांनी सांगितले.