Mumbai News : डोंबिवली हादरलं! खुर्चीचा धक्का लागला म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये गोळीबार

Firing in live orchestra : खुर्चीला धक्का लागला म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये (live orchestra) गोळीबार झालाय. या घटननंतर डोंबिवलीमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. (Mumbai Crime News)

सौरभ तळेकर | Updated: Jan 10, 2024, 04:13 PM IST
Mumbai News : डोंबिवली हादरलं! खुर्चीचा धक्का लागला म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये गोळीबार title=
Mumbai Crime News Firing in Dombivli

Mumbai Crime News : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी (Maharastra Crime Rate) वाढत असल्याचं चित्र समोर येत आहे. खुलेआम बंदूक घेऊन जाण्याचं प्रमाण देखील वाढल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच आता डोंबिवलीमधून (Dombivli Crime) हादरवणारी घटना समोर आली आहे. खुर्चीला धक्का लागला म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये (live orchestra) गोळीबार झालाय. या घटननंतर डोंबिवलीमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणात आता मोठं पाऊल देखील उचललंय. 

नेमकं काय झालं?

मानपाडा भागातील लाइव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये रात्री ही घटना घडलीय. काही लोक बारमध्ये बसले असताना एका व्यक्तीचा खुर्चीचा धक्का लागल्याने आरोपीने गोळीबार केला आहे. या गोळीबारात तरुणाच्या खांद्याला गोळी लागली असून त्यात तो जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यात चार आरोपीला दोन तासात पकडून मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. चारही आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर मुख्य आरोपी अजय सिंग यांच्याकडे बंदूक सापडली आहे.

मुख्य आरोपी अजय सिंग याच्याकडे बंदूक कुठून आली? याचा तपास सृरू असून, या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्टी रंगात आली असताना खुर्चीला धक्का लागल्याने आरोपी अजय सिंग याने वाद सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. शाब्दिक वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने जवळचं पिस्तूल काढून पिडित व्यक्तीच्या खांद्यावर गोळी झाडली.

आरोपीच्या हत्यातून पिडीत व्यक्ती कसाबसा वाचला. त्यानंतर तो जखमी अवस्थेत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ही घटना घडल्यानंतर आरोपी अजय सिंग आणि त्याच्या मित्रांनी पळ काढला. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाने तपास सुरू केलाय.

दरम्यान, नुकतीच डोंबिवलीत दहशत पसरवणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांवर डोंबिवली पोलिसांनी (dombivli police) मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. डोंबिवलीचे एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अक्षय अहिरे, सनी तुसांबड, सागर चव्हाण असे मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत.