Crime News : मुंबई हादरली! 62 वर्षीय प्रियकराचा महिलेवर ॲसिड हल्ला; आरोपीला अटक

Mumbai crime : मुंबईल्या ॲसिड हल्ल्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Updated: Jan 14, 2023, 09:34 AM IST
Crime News : मुंबई हादरली! 62 वर्षीय प्रियकराचा महिलेवर ॲसिड हल्ला; आरोपीला अटक title=

Crime News : मुंबईच्या (Mumbai Crime News) गिरगाव (girgaon) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेवर ॲसिड हल्ला (acid attack) झाल्याचा हृदयद्रावक प्रकार शुक्रवारी पहाटे घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींला ताब्यात घेतले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही महिला गेल्या 25 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (live in relationship) राहत होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. याच वादातून आरोपीने महिलेच्या चेहऱ्यावर ॲसिड हल्ला केला.

गिरगावच्या फणसवाडी परिसरात आरोपी महेश पुजारी (62) या ॲसिड हल्ला झालेल्या महिलेसोबतच राहत होता. गेले काही दिवस त्यांच्यात वाद सुरु होता. या कारणावरून महिला महेशला घर सोडण्यासाठी सांगत होती. याच रागातून गेल्या दोन दिवसांपासून महेश घराबाहेर राहत होता. शुक्रवारी पहाटे ही महिला पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडली असता दबा धरुन बसलेल्या महेशने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. यानंतर महिलेचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. महिलेची परिस्थिती सध्या गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

यानंतर एलटी मार्ग पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली. सध्या आरोपीची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हल्ल्यासाठी कारण काय ठरलं?

जखमी झालेली महिला पती सोडून गेल्याने आरोपी महेशसोबत 25 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. आरोपी महेशचे पहिले लग्न झाले असताना तो या महिलेसोबत राहत होता. महिलेला तिच्या पतीपासून दोन मुले देखील आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुलांचे त्यांचे आईकडे येणे वाढू लागले. यामुळे तिने महेशला घरातून निघून जाण्यास सांगितले. यानंतर दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले.

याचाच राग मनात धरून महेशने पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलेवर ॲसिड फेकून पळ काढला. या हल्ल्यात महिला 50 टक्के भाजली आहे. 

"महिला पाणी भरत असताना पहाटे साडेपाच वाजता तिच्यावर अॅसिड फेकण्यात आले. आरोपीने प्रथम तिच्यावर अत्याचार केला. पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता कलम 326 (अ), 307, 504, 506 अंतर्गत खुनाचा प्रयत्न, अॅसिड आणि धमकी देऊन गंभीर दुखापत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.