पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशींची उचलबांगडी, हे आहे खरं कारण

कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकार आणि प्रशासनात समन्वय नाही

Updated: May 8, 2020, 09:22 PM IST
पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशींची उचलबांगडी, हे आहे खरं कारण  title=

मुंबई : मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकार आणि प्रशासनात समन्वय नसल्याचे आढळून आले. यावरुन राज्य सरकारवर विरोधकांनी टीका देखील केली. या पार्श्वभुमीवर ही महत्वाची घटना समोर येत आहे. 

कोरोना काळात समन्वय पालिका प्रशासनाकडू समन्वयाचा अभाव दिसला. 
आरोग्य सेवा सुधारण्यात अपयश दिसले. महापालिका रुग्णालयांमधील गैरसोयींबद्ल अनेक तक्रारी समोर आल्या. यासाठी आयुक्तांना जबाबदार धरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  
 
विविध शासकीय एजन्सींबरोबर पालिकेचा समन्वय नाही. महापालिका अधिकाऱ्यांमध्ये कामाची नीट विभागणी दिसत नाही. वॉर्ड ऑफिसर आपल्या मर्जीने वॉर्डमध्ये निर्णय घेत होते. त्यांच्याशी आयुक्तांनी समन्वय ठेवला नाही. हे देखील परदेशींच्या बदलीमागचे महत्वाचे कारण मानले जात आहे. 

शासनाने काढलेले आदेश लागू न करता परस्पर काहीही आदेश जारी करण्यात आले. तसेच काढलेले आदेश बदलल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

कोरोना रोखण्यासाठी सर्व मुंबईसाठी एकच उपाययोजना राबवण्यात आल्या. तसेच प्रोटोकॉल राबवण्यात पालिकेला अपयश फिल्डवर न फिरता बंगल्यावर बसून केवळ मुख्यमंत्री फेलोशिपमधील मुलांना घेवून आदेशांचा भडीमार 

आदेश काढताना खालच्या अधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यानं गोंधळ वाढल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांनी अनेक परस्परविरोधी आदेश काढले, ज्यामधील अनेक आदेश मागे घेण्याची वेळ आली. प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार न करता केवळ आदेशांचे कागदी घोडे नाचवल्याचे दिसून आले.