Mumbai Corona News : कोरोनानं (Corona Cases) जगाची पाठ सोडली नसली तरीही मुंबई आणि महाराष्ट्रात (Maharashtra News) मात्र कोरोना बऱ्याच अंशी अटोक्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण, खरंच असं आहे का? कारण, गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामध्ये (Mumbai) मुंबईत नव्यानं सापडणाऱ्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. परिणामी आता शहरात H3N2 मागोमागच कोरोनाही पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात रविवारी कोरोनाचे 46 नवे रुग्ण सापडले. रविवारी सक्रिय रुग्णांचा आकडा होता 258. ज्यामध्ये 74 रुग्ण मुंबईतील होते असं सांगण्यात आलं. थोडक्यात सध्या महाराष्ट्रात खोकला, तापाचे रूग्ण वाढत असताना, कोरोना रूग्णसंख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.
हवामानात होणारे बदल आणि सातत्यानं वाढणारं प्रदूषण पाहता, भारतामध्ये सर्दी खोकला अशा तक्रारी असणारे H3N2 Influenza चे रुग्ण वाढत असल्याची बाब अखेर आयसीएमआरनं नजरेत घेतली. कोरोनासारखीच लक्षणं असल्यामुळं हा संसर्ग अनेकांच्या आरोग्यावर परिणाम करताना दिसत आहे. श्वसनक्रियेमध्ये यामुळं काही अडचणी उदभवताना दिसत आहेत.
सदरील परिस्थितीमध्ये साधारण आठवडाभ ही लक्षणं दिसून येतील. यातही न घाबरता डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांच्या सांगण्यावरूनच औषधं घेण्याचा सल्ला आयसीएमआरनं दिला आहे. तर, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्याचं आवाहनही केलं आहे.