मुंबई : वांद्रे पश्चिम येथील रिझवी इंजिनिअर कॉलेज शेजारी शेरलो राजन मार्गावर एक रिकामी इमारत बाजूच्या निवासी इमारतीवर कोसळून ( Mumbai Building Collapse) झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही रहिवासी अडकले असण्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#BreakingNews बांद्रा पश्चिमेला इमारत कोसळली । मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील रिझवी इंजिनिअर कॉलेज शेजारी शेरलो राजन मार्गावर एक रिकामी इमारत बाजूच्या निवासी इमारतीवर कोसळली । या विचित्र दुर्घटनेत दोन जण जखमी झालेत. @ashish_jadhao https://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/I3QFF5t5ob
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 18, 2020
कल्पना इमारतीसमोर असलेली ही चार मजली रिकामी इमारत शेजारच्या निवासी इमारतीवर कोसळली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दजाचे जवान, ८ फायर वाहने, दोन रेस्क्यू वाहने, दोन जेसीबी, चार डंपर आणि ५० मजूर घटनास्थळी दाखल झाले. तिथे सध्या युद्धपातळीवर मदतकार्य सुरु असून दोन रहिवाशी जखमी झाले आहेत.
Rescue operation is over. Two persons who were rescued by fire brigade have been admitted to hospital: Shashikant Kale, Chief Fire Officer, Mumbai Fire Brigade. #Maharashtra https://t.co/uncemXLucy pic.twitter.com/4IQz6P94sP
— ANI (@ANI) August 17, 2020
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त इमारत गेले काही महिन्यांपासून रिकामीच होती, असे सांगण्यात येत आहे. इमारत नेमकी कोणत्या कारणाने कोसळली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.