Mumbai Bomb Threat Call News In Marathi : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना धमकीचे अनेक फोन येत आहेत. अशातत आता मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा मेसेज वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
Mumbai Traffic Police Control Room receives a threat message from an unknown person. The message states that bombs have been placed at six locations across Mumbai. Mumbai police and other agencies are alert after the message. Efforts are underway to trace the message sender:…
— ANI (@ANI) February 2, 2024
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीकडून वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला होता. संपूर्ण मुंबईत 6 ठिकाणी बॉम्बस्फोट ठेवण्याचा मेसेज पाठवण्यात आल्याचे म्हटले आहे. या मेसेजनंतर मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे. 'एएनआय'ने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांना यापूर्वीही असे अनेक धमकीचे फोन आले आहेत. याआधी पुणे पोलिस नियंत्रण कक्षालाही धमकीचा संदेश आला होता. गुरुवारी रात्री पुणे पोलिस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पुणे हॉस्पिटल बॉम्बने उडवण्याचा मेसेज पाठवण्यात आला आहे. त्यानंतर पुना रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. पुना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब स्निफर पथकही तैनात करण्यात आले होते. धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीची पोलिस चौकशी करत आहेत.
कोणीही घाबरू नये, असे आवाहनही मुंबई पोलिसांनी केले आहे. यापूर्वीही मुंबई पोलिसांना अनेक धमकीचे कॉल आणि मेसेज आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मुंबई दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा फोन आला होता. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपीचे लोकेशन शोधून काढले आहे. पोलिसांनी तपास केला असता, फोन करणाऱ्याने दारूच्या नशेत फोन केल्याचा निष्पन्न झालं आहे. आरोपीने दिलेल्या माहितीत तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.