पालिका आणि रेल्वे प्रशासनाला जाग : ४४५ पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटला सुरूवात

४४५ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं काम सुरू केलंय.

Updated: Jul 6, 2018, 07:51 PM IST

मुंबई : अंधेरी पादचारी पूल दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे ४४५ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं काम सुरू केलंय.यासाठी १२ टीम बनवण्यात आल्या असून आयआयटी मुंबईचे तज्ञही या टीममध्ये आहेत.  प्राथमिक तपासणीला सुरूवात केली असून पाहणीची सुरूवात दादरच्या टिळक पुलापासून करण्यात आली. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेकडून काही गोष्टींची अपेक्षा व्यक्त केली.

बीएमसीचे रेल्वेला अडीच कोटी

 फूटपाथच्या लादीमधून लिकेज होवून ते ब्रिजमध्ये जात असल्याचे सांगत ते दुरूस्त करून घेण्यास सांगण्यात आलं. बीएमसीनं या पुलाच्या दुरूस्तीसाठी अगोदरच अडीच कोटी रूपये रेल्वेला दिले आहेत, ज्याचे काम सध्या सुरू आहे. सुरूवातीला जुन्या पुलांची पाहणी करून आवश्यकता असल्यास दुरूस्ती केली जाणार आहे.