मुंबई : देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे सर्वत्र अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसें दिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यामुळे हॅास्पिटल आणि कोव्हिड सेंन्टरमध्ये अचानक रुग्ण संख्या वाढल्यामुळे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. कुठे रुग्णालयात बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता आहे, तर काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे. अशा परिस्थितीत रुग्णांचे उपचार करत असलेल्या डॉक्टरांची परिस्थिती अतिशय बिकट होत आहे. त्यांना या रुग्णांना चांगली सेवा देण्यापासून ते त्यांना बरे करण्यापर्यंत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
या गोष्टीची भयावकता आणि गांभीर्य लोकांना समजण्यासाठी मुंबईतील इन्फीशियस डिसीज फिजीशियन डॉ. तृप्ती गिलाडा यांनी एक भावनिक व्हिडीओ शेअर आहे.
डॉ. तृप्ती गिलाडा या व्हीडिओमध्ये लोकांना कळकळीची विनंती करत आहे आणि लोकांना परिस्थितीची जाणीव करुन देत आहे. ती हे सगळ सांगताना अत्यंत भावूक झाली आहे. ती जड मनाने म्हाणाली की, हळूहळू सगळ्याच राज्यांची आणि शहरांची अवस्था बिकट झाली आहे. मुंबईतील हॅास्पिटलमध्ये आयसीयू रिकामे नाहीत, आम्ही असहाय्य आहोत. डॉ. तृप्ती गिलाडा म्हणाली की, "गेल्या एक वर्षापासून आपल्याला कोरोना झाला नाही म्हणजे तुम्ही सुपरहिरो आहात, किंवा तुमची प्रतिकारशक्ती चांगली आहे. म्हणून तुम्हाला कोरोना होणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गैरसमजात आहात. आमच्याकडे सध्या एक 35 वर्षांच्या तरूण रुग्ण आहे, जो व्हॅटिलेटरवर आहे आणि त्याची प्रकृती अतिशय नाजूक आहे.
This doctor is crying of helplessness
Please listen to her
And protect yourselves
Govt seems to be having no plan
So take care of urselves
Even frontline workers like doctors seem to be losing out now pic.twitter.com/WB6pqntOaC— Sakshi Joshi (@sakshijoshii) April 21, 2021
डॉ. तृप्ती गिलाडा म्हणाली की, "इतकी वाईट अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नव्हती, आम्हाला इतक्या सगळ्या लोकांचे एकत्रित व्यवस्थापन करावे लागेले. आम्ही त्यांच्या घरात ऑक्सिजन ठेवून लोकांचे व्यवस्थापन सध्या करत आहोत." आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न करताना पुढे त्या म्हणाल्या, "सध्याच्या परिस्थितीत आम्हा सर्व डॉक्टरांचा इमोशनल ब्रेकडाउन होत आहे. म्हणून आपली काळजी घ्या आणि स्वतःचे रक्षण करा."