Air Pollution News : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबईची हवा बिघडली. (Mumbai News ) हवेत विषारी वायू पसरल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) तापमानातील घट आणि प्रदूषित घटकांच्या वाढत्या प्रमाणामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरांतील हवा प्रदूषण अतिप्रदूषित पातळीवर पोहोचले आहे. (Latest Mumbai News in Marathi)
मुंबईतील माझगाव, कुलाबा, अंधेरी, मालाड, चेंबूर या भागांसह नवी मुंबई शहरातील हवेत विषारी घटकांचे प्रमाण अतिशय वाढले आहे. मुंबईतील माझगाव येथील हवा सर्वाधिक धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल सफर संस्थेनं दिला आहे. मुंबईच्या हवेत नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त झाले आहे. यामुळे श्वसनाचे विकार वाढले आहे. दम्याचे रुग्ण, श्वसनाचे त्रास असलेल्यांना याचा सर्वाधिक त्रास जाणवत आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन होता. त्यामुळे सगळेच ठप्प झाले होते. याचा परिणाम हा प्रदूषण कमी होण्यास झाला होता. हवेची गुणवता चांगली नोंदवली गेली होती. आता दोन वर्षांच्या कोव्हिड गॅपनंतर, पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटसह बांधकामाना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. मुंबईत अनेक विकासकामे सुरु आहेत. यात मेट्रो रेल्वेचे काम, बांधकाम व्यावसायिकांकडून उभारण्यात ईमारती यामुळे हवेत धुळीचे कण मिसळत आहेत. तसेच दाट धुके यामुळे हवेची गुणवत्ता घसरली आहे. थंड वारे आणि वाऱ्याच्या वेगातील बदल आणि वाहनांचे उत्सर्जन वाढले आहे. या हिवाळ्यात 'मॅक्सिमम सिटी'मध्ये प्रदूषणाची पातळी वाढली आहे.
Maharashtra Pollution Control Board (MPCB) : वायुप्रदूषण पाहण्यासाठी हवेतील सूक्ष्म कणांच्या संदर्भात मोजले जाते.(Air pollution is measured in terms of particulate matter (PM) शून्य आणि 50 मधला AQI “चांगला” मानला जातो, 51-100 “समाधानकारक”, 200-300 “खराब” तर 300-400 “अतिशय वाईट” आणि 400-500 “गंभीर” मानला जातो.
हवेतील गुणवत्ता खालावल्याने आजारांचा धोका वाढला आहे. दरम्यान, पुन्हा कोविड-19 रुग्णांची काही ठिकाणी वाढ झाली. त्यातच थंडीत खोकल्याचे रुग्णांत वाढ झाली. त्यामुळे या हिवाळ्यात तीव्र खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त होत होती. हे कोव्हिडचे रुग्ण नसून ते खराब हवामानाचे बळी ठरले आहे. डॉक्टरांच्या मते हा इतर काही विषाणू असू शकतो आणि मुख्यतः वाढत्या प्रदूषणाशी संबंधित असू शकतो.
दरम्यान, मुंबई हवामान कृती आराखड्या 2022 नुसार, मुंबईतील एकूण उत्सर्जनामध्ये घनकचऱ्याचा वाटा 8 टक्के आहे, तर वाहनांच्या उत्सर्जनाचा वाटा 20 टक्के आहे. वॉर्डनिहाय विश्लेषण सांगते की मानखुर्द, गोवंडी आणि देवनार सारख्या भागात असलेल्या एम-पूर्व प्रभागात वायू प्रदूषणाची पातळी गंभीर आहे.