अनंतच्या लग्नानिमित्ताने मुकेश अंबानी यांच्याकडून 3 महिन्यांचं जिओ रिचार्ज मोफत? काय आहे सत्य

Anant-Radhika Wedding : आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिक मर्चंटचा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडला. यानिमित्ताने Reliance Jio आपल्या युजर्ससाठी 3 महिन्यांचं रिचार्ज मोफत देत असल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 15, 2024, 04:02 PM IST
अनंतच्या लग्नानिमित्ताने मुकेश अंबानी यांच्याकडून 3 महिन्यांचं जिओ रिचार्ज मोफत? काय आहे सत्य title=

Anant-Radhika Wedding : आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिक मर्चंटचा शाही विवाहसोहळा मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये (Jio World Center) पार पडला. या विवाहसोहळ्याला जगभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. अनंत अंबानीच्या लग्नानिमित्ताने Reliance Jio आपल्या युजर्ससाठी 3 महिन्यांचं रिचार्ज मोफत देत असल्याचा मेसेज व्हायरल (Fake Message) झाला आहे.  WhatsApp वर हा मेसेज शेअर करण्यात आला आहे. हा मेसेज हिंदीत असून यात मोफत रिचार्जसाठी लिंकवर लिंक करण्याचं आवाहन युजर्सना करण्यात आलं आहे. 

फेक व्हायरल मेसेज
वास्तविक Reliance Jio कडून अशी कोणतीही ऑफर युजर्ससाठी देण्यात आलेली नाही. व्हायरल होणार हा मेसेज फेक असून यावर विश्वास ठेऊ नका असं आवाहन Reliance Jio ने केलं आहे. मेसेजमध्ये '12 जुलै रोजी अनंत अंबानी यांच्या लग्नानिमित्ताने मुकेश अंबानी देशभरातील जिओच्या सर्व युजर्सना 3 महिन्यांसाठी 799 रुपयांचं मोफत रिचार्ज देत आहेत. यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंकवर क्लिक करा आणि आपला नंबर रिचार्ज करा, असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलंय. यात महाकॅशबॅक नावाच्या अज्ञात साईटच्या लिंकचा समावेश आहे. 

'लिंकवर क्लिक करु नका'
सायबर तज्ज्ञांनी अशा कोणत्याही लिकंवर क्लिक न करण्याचं आवाहन युजर्सना केलं आहे.  जिओ वापरकर्त्या युजर्सने अधिकृत  MYJio अॅपवर किंवा Google Pay सारखअया विश्वासनीय ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजमध्ये फेक लिंक देण्यात आलेली आहे. अशा फेक लिंकवर क्लिक केल्याने तुमचं अकाऊट खाली होऊ शकतं. सायबर भामट्यांचा हा डाव असू शकतो, अंसही सांगण्यात आलं आहे. 

कसे ओळखाल स्कॅम मेसेज
WhatsApp वर फेक किंवा स्कॅम मेसेज ओळखल्यास वेळीच संभाव्य फसवणूकीपासून वाचू शकतो. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अज्ञात मोबाईल नंबरवरुन आलेले कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेऊ नका. विशेषत: ज्यात लिंकवर क्लिक करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या असतात. असे फेक मेसेज फॉरवर्ड करु नका. तुम्ही बक्षीस जिंकलात, किंवा ऑफर आहे अशा लिंकवर क्लिक करण्याआधी अधिकृत साईटवर जाऊन तपासून पाहा. सायबर गुन्हेगार नवनवे फंडे काढून सामान्यांची फसवणूक करत असतात. देशात सध्या सर्वात जास्त ऑनलाईन फसवणूकीचे (Online Fraud) गुन्हे दाखल आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x