कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या मुंबईकरांवर काळाचा घाला, सहा ठार

मुंबईहून कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या आरामदायी बसला अपघात होऊन सहा जण जागीच ठार झाले. तर पंधरा गंभीर जखमी झाले. कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील अन्निगेरी तालुक्यातील कोळेवाड क्रॉसजवळ हा अपघात घडला. सर्व मृत आणि जखमी मुंबईचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईची आरामदायी बस हंपी, बदामीसह दक्षिण कर्नाटकात सहलीसाठी गेली होती. ते परतत असताना कोळेवाड क्रॉसजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने बसला जोराची धडक दिल्यानं बस उलटली.

Updated: Nov 17, 2018, 03:47 PM IST
कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या मुंबईकरांवर काळाचा घाला, सहा ठार  title=

मुंबई : मुंबईहून कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या आरामदायी बसला अपघात होऊन सहा जण जागीच ठार झाले. तर पंधरा गंभीर जखमी झाले. कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील अन्निगेरी तालुक्यातील कोळेवाड क्रॉसजवळ हा अपघात घडला. सर्व मृत आणि जखमी मुंबईचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईची आरामदायी बस हंपी, बदामीसह दक्षिण कर्नाटकात सहलीसाठी गेली होती. ते परतत असताना कोळेवाड क्रॉसजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने बसला जोराची धडक दिल्यानं बस उलटली.

सहाजण ठार

यामध्ये सहाजण जागीच ठार झाले.  मृतांमध्ये विश्वनाथ म्हात्रे,  दिनकर म्हात्रे, रमेश जयमला, सुमेधा जयमाला, लहु किर्लोस्कर आणि सुचित्रा राहुल यांचा समावेश आहे.

बसमधील एकूण प्रवाशांपैकी पंधरा जण गंभीर जखमी झाले असून या सर्वांवर हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.