मुलुंड एटीएम लूट : परदेशी दाम्पत्याला अटक

पंधरा दिवसांपूर्वी मुलुंडच्या एटीएममधून एटीएमचा डेटा चोरून मुंबईतल्या १०० हून अधिक जणांना गंडा घालणाऱ्या एका परदेशी दाम्पत्याला पकडण्यात मुलुंडच्या नवघर पोलिसांना यश आलंय. देशाची राजधानी नवी दिल्लीमधून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय. आज त्यांचा ट्रान्झिट रिमांड घेण्यात येणार आहे.

Updated: Dec 28, 2017, 08:23 AM IST
मुलुंड एटीएम लूट : परदेशी दाम्पत्याला अटक title=

मुंबई : पंधरा दिवसांपूर्वी मुलुंडच्या एटीएममधून एटीएमचा डेटा चोरून मुंबईतल्या १०० हून अधिक जणांना गंडा घालणाऱ्या एका परदेशी दाम्पत्याला पकडण्यात मुलुंडच्या नवघर पोलिसांना यश आलंय. देशाची राजधानी नवी दिल्लीमधून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय. आज त्यांचा ट्रान्झिट रिमांड घेण्यात येणार आहे.

मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा १०० पेक्षा जास्त असल्याचे पुढे आले होते. याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले होते. मुलुंड येथील एटीएममध्ये सीसीटीव्ही लावून पासवर्ड हॅक करण्यात आला होता. त्याच्यामाध्यमातून जवळपास २० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली होती. ही रक्कम रात्री ११.५९ ते १ वाजताच्या दरम्यान काढण्यात येत होती.

दरम्यान, फसवणूक झाल्याचे समजाताच अनेकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी नवघर पोलिसांचं तपास पथक नवी दिल्लीला रवाना झाले होते. मुलुंड नवघर रोड परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये हा कार्ड क्लोनिंगचा प्रकार घडला आहे. 

सोमवारी ३५ खातेदारांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले. मंगळवारी तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत अंदाजे २० लाखांहून अधिक रक्कम खात्यांतून काढून घेण्यात आली आहे. दरम्यान तक्रारदारांचा आकडा १०० हून अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ही शक्यता खरी ठरलेय.