मुकेश अंबानी यांचा पगार यंदा शून्यावर का? नीता अंबानींना भत्ता किती? अंबानींच्या चुलत भावाला किती पगार?

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ होणे आता नवीन राहिलेलं नाही. मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत सध्या बाराव्या स्थानी आहेत. पण 

Updated: Jun 4, 2021, 07:35 PM IST
मुकेश अंबानी यांचा पगार यंदा शून्यावर का? नीता अंबानींना भत्ता किती? अंबानींच्या चुलत भावाला किती पगार? title=

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ होणे आता नवीन राहिलेलं नाही. मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत सध्या बाराव्या स्थानी आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, मुकेश अंबानी यांनी कोरोना काळात कंपनीकडून कोणताही पगार घेतला नाही. मुकेश अंबानी यांना वाटलं म्हणून त्यांनी आपल्या कंपनीकडून पगार न घेण्याचा निर्णय घेतला, तो देखील कोव्हिड काळात. पण मुकेश अंबानी यांनी कंपनीसाठी काहीच काम या काळात केलं नसेल असं नाही, कारण कंपनीचे चेअरमन सतत कंपनीचा फायदा आणि नवीन गोष्टी वाढवण्याच्या प्रक्रियेत असतात. 

तर दुसरीकडे नीता अंबानी देखील आपल्या कंपनीसाठी मेहनत घेत असतात, यासाठी नीता अंबानी यांना प्रत्येक बैठकीसाठी ८ लाख रुपये आणि वर आणखी कमिशन देखील मिळतं.

रिलायन्स ग्रुपची वार्षिक जनरल मिटिंग २४ जून रोजी होणार आहे. पण त्याआधी वार्षिक अहवाल सादर करण्यात आला आहे. ज्यानुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये अंबानी याना शून्य पगार असेल. कोरोना महामारीत लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे, या पैशातून त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मदत केली आहे. 

मागील आर्थिक वर्षात त्यांनी कंपनीकडून १५ कोटी रूपये रक्कम पगार म्हणून घेतली होती. मुकेश अंबानी मागील १५ वर्षापासून १५ कोटी रुपये पगार घेत आहेत, त्यांनी त्यात कोणतीही वाढ किंवा कपात केलेली नाही.

पत्नी नीता अंबानी आणि चुलत भावाला किती पैसा

अंबानी यांची पत्नी नीता अंबानी ज्या कंपनीच्या संचालक मंडळात - स्वीकृत सदस्य आहेत, त्या प्रत्येक बैठकीत सामील होण्याची फी ८ लाख रुपये घेतात. एवढंच नाही, त्यांनी १ कोटी ६५ लाख रुपये कमीशन देखील वेगळं घेतलं आहे. 

अंबानी यांचे चुलत भाऊ निखिल आणि हिताल मेसवानी यांच्या पगाराचा विचार केला तर, त्यांचा पगार वार्षिक २४ कोटी रूपयांवर कायम आहे. पण यावेळी यात १७.२८ कोटी रुपये कमिशनचा देखील समावेश आहे.

इतर मेंबर्सच्या सॅलरीत वाढ

कंपनीचे कार्यकारी निर्देशक पी एम एस प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांच्या वेतनात यावेळी वाढ करण्यात आली आहे. प्रसाद यांना आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ११.९९ कोटी रूपये मिळाले होते. पण मागील वर्षी त्यांना ११.१५ कोटी रूपये मिळाले. पवन कुमार कपिलच्या वेतनातही वाढ झाली आहे. यावेळी त्यांना ४ कोटी २४ लाख रुपये पगार म्हणून मिळाले आहेत. 

पहिल्यांदा हा पगार ४ कोटी ४ लाख रुपये होता. याशिवाय दुसऱ्या स्वतंत्र निर्देशकांना १ कोटी ६५ लाख रुपयांचं कमिशन आणि ३६ लाख रुपये बैठक भत्ता मिळाला होता.