मुंबई : वायू चक्रीवादळामुळे मान्सून लांबला. मात्र, आता वादळाचा अडथा संपल्याने मान्सून २१जूनला महाराष्ट्र राज्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अरबी समुद्रात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने मान्सून हळूहळू पुढे सरकत आहेत. दक्षिण कोकण आणि मुंबईत दोन तीन दिवसात चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.
कर्नाटकामध्ये स्थिरावलेला मान्सून २१ जूनला महाराष्ट्रात धडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केला आहे. अरबी समुद्रात मान्सून अनुकूल वातावरण तयार झाले आहे. विदर्भात मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असली तरी मध्य महाराष्ट्र किनारपट्टी भाग इथे तुरळक स्वरूपाचा पाऊस चालू आहे. वायू चक्रीवादळामुळे काहीसा लांबलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला.