'काँग्रेसनं राणेंचे सगळे हट्ट पुरवले, पण...'

नारायण राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसवर केलेले सर्व आरोप काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांनी फेटाळून लावलेत.  

Updated: Sep 22, 2017, 02:38 PM IST
'काँग्रेसनं राणेंचे सगळे हट्ट पुरवले, पण...' title=

मुंबई : नारायण राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसवर केलेले सर्व आरोप काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांनी फेटाळून लावलेत.  

काँग्रेसकडून नारायण राणेंचे सर्व हटट् पुरवले गेले... मात्र नारायण राणेंनी काँग्रेसवर टीका करत पक्षाला सोडचिट्ठी दिली. काँग्रेसने वारंवार राणेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता, अशी महिती मोहन प्रकाश यांनी दिलीय.

काँग्रेसनं आपल्याला मुख्यमंत्रीपदाचं लालूच दाखवल्याचंही नारायण राणेंनी म्हटलं होतं... त्यावर फिरकी घेत सध्या काँग्रेस पक्षाकडे नारायण राणेंना मुख्यमंत्री बनवण्याइतकं संख्याबळ नसल्याचं मोहन प्रकाश यांनी म्हटलंय.