चंद्रकांत पाटील - राज ठाकरे यांच्यात कृष्णकुंजवर हायव्होल्टेज भेट, पाऊणतास चर्चा

Raj Thackeray and Chandrakant Patil meeting :  राज ठाकरे ( Raj Thackeray) आणि  चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांची आज हायव्होल्टेज भेट मुंबईत झाली. 

Updated: Aug 6, 2021, 02:15 PM IST
चंद्रकांत पाटील - राज ठाकरे यांच्यात कृष्णकुंजवर हायव्होल्टेज भेट, पाऊणतास चर्चा title=

मुंबई : Raj Thackeray and Chandrakant Patil high voltage meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांची आज हायव्होल्टेज भेट मुंबईत झाली. दोन्ही नेते पाऊण तास एकत्र होते. या भेटीत भाजप-मनसे युतीची (BJP-MNS alliance) चर्चा झालेली नाही. तर, परप्रांतियांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीत मनसे- भाजप भेटीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

परप्रांतियांना राज ठाकरे यांचा विरोध नाही, मात्र ते त्यांनी व्यवहारात दाखवावे, असे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र राज यांनी एका मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये यायला पाहिजे, असे पाटील यांनी म्हटले आहे. दोन हिंदू माणसं एकमेकांची भेट घेतात तेव्हा एकमेकांना पुन्हा भेटू असे म्हणतात, असे सांगत अशा भेटी भविष्यातही होतील याचे त्यांनी यावेळी सुतोवाच केले. त्याचवेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ही जनतेच्या मनातली इच्छा मी त्यांच्यासमोर व्यक्त केली, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आगामी, 2022 बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत ( Brihanmumbai Municipal Corporation (BMC) polls) भाजप आणि मनसे एकत्र येण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. चंद्रकांत पाटील यांनी या भेटीबाबत अधिक माहिती देताना सांगितले, राज ठाकरे यांची नाशिकला अचानक भेट झाली होती. तेव्हा त्यांनी घरी चहाला बोलावले होते, म्हणून आपण गेलो. आपली कोणतीही राजकिय चर्चा झाली की युतीचा प्रस्ताव नव्हता.

गेल्या काही दिवसांपासून मनसे - भाजप यांच्या जवळीकीची राजकिय वर्तुळात चर्चा सुरु होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही राज ठाकरे यांचा फोन आला होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपण त्यांना भेटणार असे सांगितले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.