मनसेचा आणखी एक मासा शिवसेनेच्या गळाला लागणार?

राज ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार?

Updated: Jun 10, 2018, 08:40 PM IST

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतले माजी नेते शिशिर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शिशिर शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मनसेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. पक्षात डावललं जात असल्यानं शिंदे नाराज होते. मध्यंतरी ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. दरम्यान शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नुकतीच एका लग्नासमारंभात प्रासंगिक भेट झाली होती. या बातमीसंदर्भात शिशिर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिवसनेत प्रवेश करणार असल्याची आपल्याला माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली.