मनसेनं IPL ची बस फोडली! नक्की काय आहे या मागचं कारण...

Maharashtra Navnirman sena | IPL | आयपीएल (IPL matches) खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

Updated: Mar 16, 2022, 08:43 AM IST
मनसेनं  IPL ची बस फोडली! नक्की काय आहे या मागचं कारण... title=

मुंबई : आयपीएल (IPL matches) खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस काल रात्री फोडली आहे.

महाराष्ट्रात होणारे आयपीएलच्या सामन्यातील वाहतूक व्यवसाय हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्यांच्या घशात घालायचा प्रयत्न केल्याचा मनसेचा आरोप आहे. 

आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करून ही काहीही होत नसल्याने मनसेने (MNS) हा दणका दिला आहे.अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिलीय.

महापालिका निवडणुकीबाबत राज ठाकरे यांनी दिले हे संकेत

राज्यातील महापालिका निवडणुका (Municipal Elections) कधीही जाहीर होतील. अजून तरी वातावरणात निवडणूक दिसत नाही. मात्र, निवडणुका कदाचित लागतीलच, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले आहे. निवडणुकीसाठी तयार राहा, असे संकेत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत. (Raj Thackeray On Municipal Elections)