आदित्य ठाकरेंसाठी आमदार सुनिल शिंदेंची जागा सोडण्याची तयारी

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार?

Updated: Jun 11, 2019, 02:20 PM IST
आदित्य ठाकरेंसाठी आमदार सुनिल शिंदेंची जागा सोडण्याची तयारी title=

मुंबई : निवडणूक लढवावी किंवा नाही याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. शिवसेना नेते आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवावी यासाठी मुंबईतल्या सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 

आदित्य ठाकरेंनी वरळी आणि माहिम विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची दादरच्या सेनाभवनात बैठक घेतली. तर दूसरीकडे आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभेची जागा सोडण्याची तयारी आमदार सुनिल शिंदे दर्शवली आहे.

ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीच निवडणूक लढवलेली नाही. पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक शिवसेना भवन येथे सोमवारी पार पडली. आदित्य ठाकरे यांना सक्रीय राजकारणात आणण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी, माहीम येथील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे देखील सांगण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघासाठी ही चाचपणी सुरु आहे. आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडी येथून विधानसभा निवडणूक लढवू शकतात.