मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत मागितली जाहीर माफी

जनावरांची लस चुकल्याने पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत जाहीर माफी मागितलीय.

Updated: Mar 8, 2018, 09:20 AM IST
मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत मागितली जाहीर माफी title=

मुंबई : जनावरांची लस चुकल्याने पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत जाहीर माफी मागितलीय.

लस देण्यास एक वर्ष विलंब

राज्यातील दोन कोटींहून अधिक मुक्या जनावरांना लाळ्या खुरकत रोगासाठी लस देण्यास एक वर्ष विलंब आणि दिरंगाई झाल्याबद्दल त्यांनी माफी मागितलीय. मुक्या जनावरांना लसीकरण वेळेवर झाले नाही. लसीकरण देणा-या बायोवेट कंपनीने बंगाल आणि पंजाब या राज्यात कमी दरात लस उपलब्ध करुन दिली. इतर राज्यात सहा रुपये 30 पैसे दर दिले. मग महाराष्ट्राला राज्याला सात रुपये 70 पैसे दर का दिला? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. राज्य सरकारने या सर्व गोष्टींबाबत खुलासा करावा, बायोवेट कंपनीलाच का कंत्राट दिले गेले याची मागणीही विरोधकांनी विधानसभेत केली. यावेळी जानकरांनी विधानसभेत माफी मागिली. 

उच्चस्तरीय चौकशीची मागणी फेटाळली

तसंच केंद्र सरकारनेच लसीचे दर ठरवावेत किंवा सरकारनेच दीडशे कोटी खर्च करुन लस बनवण्याचे काम सुरु करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं ते म्हणाले. मात्र पारदर्शक आणि विरोधकांवरील आरोपांची चौकशी करण्याची भूमिका घेणा-या सरकारने याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी मात्र फेटाळून लावलीय.