त्यातच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील मिसळीच्या चवीचा आस्वाद एकाच छत्राखाली घेता यावा यासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये दोन दिवस ''मिसळ महोत्सव''चे आयोजन करण्यात आले आहे. *जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील शामनगर तलाव येथे हा महोत्सव पार पडणार आहे. विलेपार्ले येथे पार पडलेल्या महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादानंतर ज्यांची या महोत्सवाला भेट देण्याची संधी हुकली अशा खवैय्यांसाठी जोगेश्वरीमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘मिसळ’ हा बहुतांशी जनतेच्या आवडीचा पदार्थ. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील मिसळीची चवही वेगवेळी असते. परंतु नोकरी धंद्यात व्यस्त असणार्या मुंबईकरांना इच्छा असूनही आपल्या कुटुंबासह विविध जिल्ह्यांमध्ये मिसळच्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी जाता येत नाही. काही दिवसांपुर्वीच मुंबईत मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही कारणांमुळे अनेक मुंबईकरांची मिसळ खाण्याची इच्छा अपुरी राहिली आहे. अशा या मुंबईकरांची इच्छा पुर्ण करण्यासाठीच जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी ६ व ७ जानेवारी २०१८ रोजी विधानसभा क्षेत्रात ‘मिसळ महोत्सवा’चे आयोजन केले आहे.
इच्छापुर्ती गणेश मंदिर परिसर, शामनगर तलाव, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मुंबईकरांना कोल्हापुर, पुणे बरोबर महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यातील मिसळच्या चवीचा मनमुराद आस्वाद एकाच छताखाली घेता येणार आहे. महोत्सवात सुमारे १० ते १२ स्टॉल्स उभारण्यात येणार आहे. शनिवार ६ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रविवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे. या महोत्सवाला खवैय्यांची होणारी गर्दी लक्षात घेता खवैय्यांना जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील, शामनगर तलावाजवळील सेवालय कार्यालयात सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत कुपन देण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी खवैय्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.