मुंबई : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आहे तर तुमच्यासाठी आहे ही गुडन्यूज. येत्या चार-पाच दिवसांत मुंबईतल्या म्हाडाच्या घरांची लॉटरीची जाहिरात येणार आहे.
म्हाडाकडून यंदा सुमारे ७८४ घरांची लॉटरी काढली जाणार आहे. अल्प उत्पन्न गटासाठी ३२२, मध्यम गटातील २२६, उच्च उत्पन्न गटातील १६८ घरांचा समावेश आहे. सायन-प्रतीक्षा नगर, विक्रोळी-कन्नमवार नगर, न्यू सिद्धार्थ नगर, कांदिवली-चारकोप व पवई-तुंगा या भागातील घरांसाठी ही लॉटरी असणार आहे.
यंदाच्या लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गटाचा समावेश नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, यंदा घरांच्याही किंमती अधिक असण्याची शक्यता वर्तवली जातेय.