तुम्ही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलाय? मग 'ही' बातमी तुमच्या कामाची

Mahada lottery 2023 : माया नगरी मुंबईत स्वत:चं आणि हक्काचं घर करण्यासाठी ज्या लोकांनी Mahada lottery 2023 साठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे.

नेहा चौधरी | Updated: Jul 28, 2023, 01:33 PM IST
तुम्ही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलाय? मग 'ही' बातमी तुमच्या कामाची  title=
mhada lottery 2023 mumbai 4082 homes latest updates today 28 july Final list

Mahada lottery 2023 : प्रत्येकाला वाटतं आपलं हक्काचं आणि स्वत:चं घर असावं. पण गेल्या काही वर्षांपासून घरांच्या वाढलेल्या किंमती पाहता सर्वसामान्याच्या आवाकातून बाहेर गेली आहेत. अशावेळी म्हाडा (MHADA Lottery 2023 Mumbai Date) आणि सिडको (CIDCO Lottery) सारख्या प्रकल्पातून कमी किंमतीत घराचं स्वप्न करण्यासाठी सोडत काढण्यात येते. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणच्या मुंबईतील वेगवेगळ्या भागातील 4082 परवडणाऱ्या फ्लॅटसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट आहे. (mhada lottery 2023 mumbai 4082 homes latest updates today 28 july Final list)

आजचं म्हाडाची वेबसाईट चेक करा!

मुंबई मंडळाच्या 4082 घरांसाठी 22 मेपासून अर्ज प्रक्रिया सुरु केली होती. या घरांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसामान्यांना 26 जूनपर्यंतची वेळ देण्यात आली होती. मुंबईतील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन परिसातील घरांसाठी  1 लाख 45 हजार 849 ऑनलाइन अर्ज म्हाडाला प्राप्त झाले आहे. या प्रक्रियेतील अंतिम यादी 28 जुलैला म्हणजे आज दुपारी 3 वाजता housing.mhada.gov.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

यापूर्वी म्हाडाने कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्याने म्हाडाच्या 527 अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरले होते. https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर ही अपात्र अर्जदारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर त्यांना 9 जुलै 2023 पर्यंताचा वेळ देण्यात आला होता. आता म्हाडाकडून आज दुपारी 3 वाजता फायनल यादी जाहीर करण्यात येणार आहे. 

या घरांसाठी अर्जदारांनी केला अर्ज

मुंबईतील प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची तरतूद अत्यल्प गटासाठी अॅन्टॉप हिल, विक्रोळीतील कन्नमवार नगर सदनिका, पहाडी गोरेगाव यासाठी अर्ज केला आहे. तर, अल्प उत्पन्नगटातील अर्जदारांना लोकमान्य नगर दादर, अॅन्टॉप हिल वडाळा, डीएन नगर अंधेरी, पंत नगर घाटकोपर, चारकोप कांदिवली, जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड या परिसरातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला आहे. 

हेसुद्धा वाचा - आता संधी सोडू नका! म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 'या' घरांसाठी पुन्हा सोडत

मध्यम उत्पन्न गटासाठी भायखळा, टिळकनगर चेंबुर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षा नगर सायन, चारकोपसह उयखळा, टिळकनगर चेंबुर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षा नगर सायन, चारकोप तर, उच्च उत्पन्न गटासाठी वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, तुंगा पवई आणि सायन इथल्या घरांसाठी अर्जदाते सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत.