Mhada Lottery 2023 : होळीच्या मुहूर्तावर मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'या' तारखा लक्षात ठेवा!

Konkan Mhada Lottery 2023 : घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण मंडळाच्या 4 हजार 752 घरांसाठी अर्ज आणि सोडतीची तारीख ठरली आहे. त्यामुळे या तारखा लक्षा ठेवा अन्यथा...

Updated: Mar 5, 2023, 09:17 AM IST
Mhada Lottery 2023 : होळीच्या मुहूर्तावर मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'या' तारखा लक्षात ठेवा! title=
mhada lottery 2023 konkan mhada Holi monday 6 March 2023 advertisement Application start wednesday maharashtra news in marathi

Mhada Lottery 2023 : प्रत्येकाला वाटतं आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी किंमतीत म्हाडा ( Mhada Lottery) आणि सिडकोचे (CIDCO) प्रकल्प येतं असतात. कमी किंमतीत आणि हक्काचे घर मिळवण्यासाठी प्रत्येक जण म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतो. आता त्यांची प्रतिक्षा संपली (Mumbai News) आहे. कारण कोकण (Konkan Board Lottery) मंडळाच्या 4 हजार 752 घरांसाठी अर्ज विक्री आणि सोडतीची तारीख ठरली आहे. ( Mhada Lottery News in Marathi) 

होळीच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी 

होळीच्या मुहूर्तावर कोकण मंडळाने घराचं स्वप्न करण्याचा ठरवलं आहे. होळीच्या दिवशी म्हणजे सोमवारी 6 मार्चला 4 हजार 752 घरांसाठी जाहीर प्रसिद्ध होणार आहे. तर बुधवार 8 मार्चपासून अर्ज विक्री होणार आहे. तर 10 मे 2023 ला ठाण्यात सोडत निघणार आहे. (mhada lottery 2023 konkan mhada Holi monday 6 March 2023 advertisement Application start wednesday maharashtra news in marathi)

'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'

या सोडतीत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेचा वापर करण्यात येणार आहे. विरार – बोळींजमधील 2 हजार 48 घरांसाठी ही योजना वापरण्यात येणार आहे. हे घरं अल्प आणि मध्यम गटातील असून त्यांची किंमत 23 ते 41 लाखांपर्यंत आहे. 

'या' तारखा लक्षात ठेवा!

कोकण मंडळ विभागाची सोडत जाहिरात - सोमवारी 6 मार्च 2023

अर्ज विक्री - बुधवार 8 मार्च 2023

अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 12 एप्रिल 2023

सोडत - 10 मे 2023 

स्थळ - डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
 
वेळ - सकाळी 10 वाजता.

'या' सोडतीची महत्त्वाची माहिती 

कोणासाठी - अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गट

एकूण घरं - 4,752

पंतप्रधान आवास योजना - 984 घरं

1,554 घरं 20 टक्के योजनेनुसार

उर्वरित घरं म्हाडा गृहनिर्माण योजनेतर्गंत