मुंबईत हक्काचं घर मिळणार, सिडकोपाठोपाठ म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी

मुंबईत 4 हजारांहून अधिक घरांसाठी निघणार सोडत, पाहा कधी आणि कुठे मिळणार हक्काची घरं

Updated: Nov 23, 2022, 09:25 PM IST
मुंबईत हक्काचं घर मिळणार, सिडकोपाठोपाठ म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी  title=

Mhada Lottery : मुंबई महानगर (Mumbai) परिसरात घरांच्या किमती गगनाला भिडल्यात. त्यामुळे सामान्य लोकं परवडणाऱ्या दरांत घरं घेण्यासाठी म्हाडाच्या (MHADA) सोडतीची आतुरतेनं वाट पाहत असतात. त्यातच आता म्हाडाच्या घरांसाठी डिसेंबरमध्ये सोडत निघण्याची शक्यता आहे. ठाणे (Thane), विरारसह (Virar) मुंबईतील काही भागांसाठी 4 हजारांहून अधिक घरांची सोडत लवकरच जाहीर होईल. सोडतीची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. त्यामुळे मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 

म्हाडाची घरं कुठे? 

ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण डोंबिवलीतील घरांसाठी सोडत

गोरेगावमध्ये 18 एकर परिसरात 5 हजार घरांची निर्मिती

5 हजारपैकी सुमारे साडे तीन हजार घरांच्या निर्मितीचं काम अंतिम टप्प्यात

2 हजार घरं अत्यल्प उत्पन्न गटासाठी 

746 घरं अल्प उत्पन्न गटासाठी

227 घरं मध्यम उत्पन्न गटासाठी

105 घरं उच्च उत्पन्न गटासाठी

सिडकोची चार हजार घरांची सोडत
म्हाडाची सोडत निघणारच आहे पण सिडकोनं (CIDCO) आधीच सोडत काढलीय. उलवे नॉडमधल्या घरांसाठी लॉटरी काढण्यात आलीय. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आलेली 4 हजार 158 घरांची सोडत आज काढण्यात आली. ही सर्व घरं नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या सिडकोने विकसीत केलेल्या नोडमध्ये आहेत. नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सिडको एक लाख घरे उपलब्ध करणार असून आतापर्यंत जवळपास 25 हजार घरे सिडकोने विकली आहेत.

हे ही वाचा : Shraddha Murder Case 'गोलमाल है...' म्हणत भाजपने उपस्थित केले सात प्रश्न

मुंबई महानगर परिसरात स्वतच्या मालकीचं आणि परवडणा-या दरात घरं असाव असं अनेकांचं स्वप्न असतं. तुमचंही असं स्वप्न असेल तर म्हाडा आणि सिडकोच्या घरांसाठी नक्की अर्ज करा.