तुम्ही राहात असलेली इमारत धोकादायक तर नाही? MHADA कडून मुंबईतील इमारतींची यादी जाहीर

MHADA Dangerous Buildings List: येत्या काही दिवसात राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. याचपार्श्वभूमीवर पावसाळाआधी म्हाडाकडून 15 अतिधोकायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 1, 2023, 03:51 PM IST
तुम्ही राहात असलेली इमारत धोकादायक तर नाही? MHADA कडून मुंबईतील इमारतींची यादी जाहीर title=
Mhada Dangerous Buildings

MHADA Dangerous Buildings List: येत्या 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनचे (Monsoon Update) आगमन होणार आहे. मुंबईत (Mumbai) दरवर्षी पावसामुळे घरांची, इमारतीची पडझड झाल्याच्य अनेक बातम्या कानी येत असतात. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून अनेक अपघातही घडले आहेत. याच गोष्टी टाळण्यासाठी म्हाडाने कंबर कसली आहे. याचपार्श्वभूमीलरक म्हाडाने (Mhada) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आता अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई शहर बेटावरील 15 अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर केली आहे. या 15 इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 7 इमारतींचा समावेश आहे.

पाहा धोकादायक इमारतींची यादी

  1.  इमारत क्रमांक 4-4 ए,नवरोजी हिल रोड क्र. १, जॉली चेंबर ( मागील वर्षीच्या यादीतील)  
  2.  इमारत क्रमांक 74 निझाम स्ट्रीट  (मागील वर्षीच्या यादीतील)
  3.  इमारत क्रमांक 42, मस्जिद स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील) 
  4. इमारत क्रमांक 61-61 ए , मस्जिद स्ट्रीट 
  5. इमारत क्रमांक 212 जे पांजरपोळ लेन 
  6. इमारत क्रमांक 173-175-179 व्ही के बिल्डिंग , प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी 
  7. इमारत क्रमांक 2-4-6 नानुभाई देसाई रोड,  मुंबई 
  8. इमारत क्रमांक 1-23  नानुभाई देसाई रोड, मुंबई 
  9. इमारत क्रमांक 351 ए, जे एस एस रोड मुंबई
  10. इमारत क्रमांक 387-391 बदामवाडी, व्ही .पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
  11. इमारत क्रमांक 17 नारायण निवास , निकटवाडी 
  12. इमारत क्रमांक 31 सी व 33 ए ,आर रांगणेकर मार्ग व 19 पुरंदरे मार्ग , गिरगावचौपाटी  ( मागील वर्षीच्या यादीतील)  
  13. इमारत क्रमांक 104-106 ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग ( मागील वर्षीच्या यादीतील) 
  14. इमारत क्रमांक 40 कामाठीपुरा 4थी गल्ली 
  15. अंतिम भूखंड क्र. 721 व 724 टीपीएस - 3 विभाग, इमारत क्रमांक40 बी व 428, आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ ( मागील वर्षीच्या यादीतील)              

यंदाच्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या  15 अतिधोकादायक उपकरप्राप्त  इमारतींमध्ये मागील वर्षी जाहीर केलेल्या 7 इमारतींचा समावेश आहे.  या अतिधोकदायक उपकरप्राप्त  इमारतींमध्ये 424 निवासी व 121 अनिवासी असे एकूण 545 रहिवासी / भाडेकरू आहेत.  मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाही नुसार 155 निवासी रहिवाशांनी स्वतःची निवर्‍याची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत 21 रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित इमारतींमधील रहिवाशी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे. तसेच 222 निवासी रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मंडळातर्फे नियोजन करण्यात आले आहे. करिता मंडळातर्फे संक्रमण शिबिरांत त्यांची पर्यायी व्यवस्था कारण्याबाबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.         

अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशाना मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे. तसेत स्वतःच्या व आपल्या पारिजनांच्या  सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.  जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. तसेच मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.