रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सेंट्रल रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप स्लो लाईवर सकाळी ११.२० ते ४.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुलुंड ते माटुंगा दरम्यान वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.

Updated: May 27, 2017, 04:57 PM IST
रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक title=

मुंबई : रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सेंट्रल रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप स्लो लाईवर सकाळी ११.२० ते ४.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुलुंड ते माटुंगा दरम्यान वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वेवर सीएसटी ते चुनाभट्टी आणि बांद्रा डाऊन हार्बर लाईनवर ११.४० ते ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. चुनाभट्टी आणि बांद्रा-सीएसटी अप हार्बर लाईनवर ११.१० ते ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

वेस्टर्न रेल्वेच्या सांताक्रुज ते गोरेगाव अप आणि डाऊन फास्ट लाईनवर सकाळी १०.३५ ते ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.