वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या, तपास सुरू

या खळबळजनक घटेनेने अनेकांनाच धक्का बसला आहे.

Updated: Jan 5, 2019, 03:49 PM IST
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या, तपास सुरू  title=

मुंबई : ठाण्यात एका खळबळजनक घटेनेने अनेकांनाच धक्का बसला आहे. डॉ. कावेरी सोम नावाच्या प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञांच्या मुलीने आत्महत्या केलाची घटना घडली आहे. ठाणे कोलशेत रोड येथे असणाऱ्या एव्हरेस्ट सोसायटीमधील ग्लोरी इमारतीत ही घटना घडली आहे. 

संबंधित इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून या तरुणीने उडी मारली असून, शर्मिष्ठा सौम असं तिचं नाव आहे. २७ वर्षीय शर्मिष्ठा ही वैद्यकिय क्षेत्राचं शिक्षण घेत होती. तिने बाराव्या मजल्यावरुन उडी मारताच इमारतीच्या सुरक्षारक्षकांनी तातडीने याबाबत माहिती दिली. त्यानंतर देताच ठाण्यातील कापूरबावडी पोलीस घटनास्थळी पोहचलेत. घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. 

मात्र, शर्मिष्ठाच्या गळ्यावर आणि हातावर संशयास्पद खुणा दिसत आहेत. त्यामुळेच ही आत्महत्या आहे की हत्या याचा पोलीस तपास करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे शर्मिष्ठाचे आई आणि वडिल दोघंही डॉक्टर आहेत. त्यामुळे शर्मिष्ठाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, सुसाईड नोट तिनेच लिहिली आहे का, तिच्या गळ्यावरील आणि हातावरील संशयास्पद व्रण कसे आले याचा तपास पोलीस करत आहेत.