8वी, 10वी, उत्तीर्णांना नोकरी हवीय? मुंबईतील माझगाव डॉक भरतीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

Mazagon dock Mumbai Bharti 2024:  माझगाव डॉक येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 15, 2024, 06:21 PM IST
8वी, 10वी, उत्तीर्णांना नोकरी हवीय? मुंबईतील माझगाव डॉक भरतीसाठी 'येथे' पाठवा अर्ज  title=
Mazagon dock Mumbai Bharti 2024
Mazagon dock Mumbai Bharti 2024: शिक्षण कमी असलं की नोकरीच्या संधीदेखील कमी होतात. आठवी, दहावीपर्यंत शिक्षण असेल तर आपल्याला कुठे नोकरी मिळणार नाही, असे अनेकांना वाटते. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण मुंबईत तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. माझगाव डॉक येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिककृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 
 
आठवी, दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना माझगाव डॉक येथील भरती प्रक्रियेत अर्ज पाठवता येणार आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे विविध विभागात अप्रेंटिस पदाच्या एकूण 512 रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात येणार आहे. 

रिक्त पदांचा तपशील

माझगाव डॉक भरती अंतर्गत ड्राफ्ट्समन (मेक.), इलेक्ट्रिशियन, फिटर, पाईप फिटर,स्ट्रक्चरल फिटर, फिटर स्ट्रक्चरल (उदा. ITI फिटर) ITI, ड्राफ्ट्समन (मेक.), इलेक्ट्रिशियन, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, आरएसी, पाईप फिटर, वेल्डर, कोपा, सुतार, रिगर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) ही रिक्त पदे भरली जातील. 

मुलाखतीवेळी 8 चुका अजिबात नका करु

बॅंकेत नोकरी कशी मिळते? किती मिळतो पगार? सर्वकाही जाणून घ्या 

पगार

या भरती अंतर्गत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ट्रेडनुसार 3 हजार ते 8 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

अर्जाची शेवटची तारीख

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 14 तर कमाल वय 21 वर्षे इतके असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडून 100 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. 2 जुलै 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.