२०२५ मध्ये मुंबई बुडणार?

पर्यावरण धोक्यात 

Updated: Mar 1, 2020, 12:03 PM IST
२०२५ मध्ये मुंबई बुडणार? title=

ऋचा वझे, झी २४ तास : मुंबई मुंबईकरांनो पर्यावरणाच्या समस्येला वेळीच गांभीर्याने घ्या. कारण मॅक्वेन्सी रिपोर्टनुसार मुंबई शहर बुडणार आहे. मुंबईकरांनो, सावधान....२०२५ मध्ये मुंबई बुडण्याची भीती व्यक्त केली आहे. मॅक्वेन्सी या संस्थेच्या अहवालानुसार 2050 पर्यंत मुंबईत पाणी तुंबण्याच्या आणि पूराच्या तीव्रतेत 25 टक्क्यांनी वाढ होणारे. ही काही फक्त आपत्तीजनक परिस्थिती नाही तर मानवानेच ओढवून घेतलेली परिस्थिती आहे.

सध्या ग्लोबल वॉर्मिंग आणि तापमानात बदल यावरून पर्यावरणाला किती धोका आहे याचा प्रत्यय येतोय. मोठ्या प्रमाणात हिमसख्लन होतंय. त्यामुळे समुद्रातली पाण्याची पातळी झपाट्यानं वाढतेय. पर्यावरण कार्यकर्त्यांनीही यासंदर्भात मोठी चिंता व्यक्त केली आहे.

दर पावसाळ्यात मुंबई तुंबतेच..... पण तरी देखील महापालिका धडे घेत नाही. पण मुंबईकरांनीही काळजी घ्यायला हवी. सहज जाता येता, ट्रेनमधून जाताना, प्रवास करताना कुठलाही कचरा रस्त्यावर टाकू नका.