नाताळनिमित्त बाजारपेठाही गजबजल्या

ख्रिसमससाठी जंगी तयारी

Updated: Dec 21, 2019, 07:43 PM IST
नाताळनिमित्त बाजारपेठाही गजबजल्या title=

मुंबई : ख्रिसमसला अवघे काही दिवस राहीले आहेत. ख्रिसमसची तयारी जंगी करण्यासाठी खरेदीला उधाण आलं आहे, तर बाजारपेठाही गजबजल्या आहेत. रॅपलिंग करणारा सांता, संगीताच्या तालावर डुलणारा सांता, स्नो मॅन, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, चांदणी कंदील अशा विविध प्रकारांनी आणि नवनव्या प्रॉडक्ट्सनी मुंबईतल्या वसई, माहीम, कल्याण, वांद्रातल्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत ख्रिसमस निमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत.

कल्याणमधील पंडित जवाहरलाल नेहरू रोड इथे रस्त्यावर बाबू आणि पेंढ्या पासून नाताळसाठी येशू ख्रिस्त जन्म देखावे उभारण्याचं काम जोरात सुरु आहे. येशूच्या जन्माची झोपडी आणि घरोघरी कंदील खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

नाताळच्या निमित्ताने चर्चमध्ये सजावट आणि रंगरंगोटीच्या कामे पूर्ण झाली आहेत. घर सजवण्यासाठी देखील ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणात वस्तूंनी खरेदी करतात. यावेळी रंगीबेरंगी लाईट्सने घर उजळून निघतं.

नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रार्थना म्हटली जाते. ख्रिस्ती बांधव यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. ख्रिस्ती बांधव आठवडाभर हा सण साजरा करतात. एकमेकांना भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. लहान मुलांमध्ये याचं विशेष आकर्षण असतं.

ख्रिस्ती बांधवांचा एकमेव सण असलेल्या नाताळच्या निमित्ताने इतर समाजातील बांधवांनाही याचं आकर्षण असतं आणि म्हणून हा सण सगळ्याच धर्माचे लोकं उत्साहाने साजरा करतात.