केतकी चितळेची आक्षेपार्ह पोस्ट, राष्ट्रवादीचा संताप, पोलिसांची दमछाक

अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली.

Updated: May 18, 2022, 10:27 PM IST
केतकी चितळेची आक्षेपार्ह पोस्ट, राष्ट्रवादीचा संताप, पोलिसांची दमछाक title=

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यानंतर केतकी विरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर राज्यभर अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झाले. (marathi actress ketaki chitale controversial facebook post on ncp head sharad pawar know details of this matter)

राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकर्ता बाहेर पडल्या.  मुंबईत आणि ठाण्यात आंदोलन करण्यात आलं. तर नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या महिलांनी आंदोलन केलं. पोलिसांनी अटक केलेल्या केतकी चितळेवर अंडी फेकली. शाइफेक करत मारहाणीचा प्रयत्न केला. 

ठाणे गुन्हे शाखेने तिचा ताबा घेतला. तो पर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलनंसाठी पोलीस बंदोबस्त, केतकीला न्यायालयात नेण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आवश्यक असल्याने पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. या सर्व प्रकरणात केतकी चितळे ही पोलिसांच्या डोक्याला ताप ठरली आहे.
 
ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने केतकीला अटक करून रविवार 14 मे ला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर 18 मे पर्यंत केतकीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तो पर्यंत पोलिसांनी केतकीचे मोबाईल आणि तिच्या कळंबोली येथील घरातून जप्त केलेला मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही सायबर सेलकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले.

गुन्हे शाखेच्या पोलिसांना संशय होता कि, या पोस्टमागे अन्य कुणाचा तरी समावेश असण्याची शक्यता आहे? यामुळेच डिव्हाईस तपासणीचा घाट घालण्यात आला. 

त्यानंतर 17 मे रोजी गुन्हे शाखेने तिची 8 तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली. केतकीला आज पुन्हा तिला न्यायालयात हजर करण्यात आलं.  ठाणे न्यायालयाने तिची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र केतकी चितळेचा ताबा मिळावा म्हणून गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात ताल ठोकला.
 
या सर्व खटाटोपानंतरही केतकीच्या चेहऱ्यावर मात्र फक्त हसुच दिसुन आलं. केतकी चितळेला ठाणे गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर आज न्यायालयीन कोठडी सुनावली जाईपर्यंत केतकीचा चेहरा हा निस्तब्ध आणि चेहऱ्यावर "हसू" असल्याचे चित्र दिसले. 

एकीकडे कार्यकर्ते हे आंदोलने करताहेत, राज्यात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होत आहेत, न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. 8 तासापेक्षा जास्त चौकशी केल्यानंतरही केतकीच्या चेहऱ्यावरील "हसू" मात्र विरले नाही.

न्यायालयात पहिल्याच दिवशी स्वतः युक्तीवाद करत सदरची पोस्ट आपणच टाकलेली आहे याची कबुली. त्यानंतर वादंग माजले. मात्र आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवरून काढून टाकण्यास नकार देणाऱ्या केतकीच्या डोक्यात शिजतंय तरी काय ? असा प्रश्न तिच्या चेहऱ्यावरील "हसू" ने निर्माण होत आहे.

केतकीला आज ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. तर न्यायालयात केतकी चितळे हिला ताब्यात घेण्यासाठी गोरेगाव पोलीस ठाण मांडून आहेत. मात्र पोस्ट टाकल्याचा पश्चाताप तिच्या चेहऱ्यावर पहिल्या दिवसापासून दिसला नाही. दिसले ते केवळ "हसू"च. 

केतकी चितळेवर गुन्हा दाखल झाला. मात्र तिला बंदोबस्तात नेण्यापासून न्यायालयीन वाऱ्या पूर्ण करताना मात्र पोलिसांची चांगलीच दमछाक झालेली आहे. 

तर दुसरीकडे तिची वैद्यकीय तपासणी आदींसाठी पोलिसांना मोठी कसरत करत असताना दमछाक तर झालीच पण केतकीच्या चेहऱ्यावर "हसू" मात्र अद्यापही विरलेले नाही. या "हसू"च्या मागे लपले तरी काय? हा एक प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.